मराठा तरुणाने तारण ठेवले सोयाबीन, 1 लाखांचे कर्ज घेऊन भरणार लोकसभेचा उमेदवारी अर्ज

Loksabha Election:  धाराशिव तालुक्यातील कारी येथील अमोल जाधव यांनादेखील आगामी लोकसभा निवडणुक लढण्याची इच्छा आहे.  

Pravin Dabholkar | Updated: Mar 23, 2024, 02:17 PM IST
मराठा तरुणाने तारण ठेवले सोयाबीन, 1 लाखांचे कर्ज घेऊन भरणार लोकसभेचा उमेदवारी अर्ज title=
Maratha Youth Loksabha

Loksabha Election: लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून देशासह राज्यातील सर्व राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. मोठ मोठ्या पक्षात उमेदवारी अर्ज भरण्यावरुन रस्सीखेच सुरु आहेत. त्यातून मग नाराजी नाट्य समोर येतंय. निवडणुकीच्या आधी पक्ष बदलणारे देखील इकडून तिकडे उड्या मारत आहेत. निवडून आल्यानंतरच जनतेचे प्रश्न सोडवता येतात,यावर अनेकांना विश्वास आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. धाराशिव तालुक्यातील कारी येथील अमोल जाधव यांनादेखील आगामी लोकसभा निवडणुक लढण्याची इच्छा आहे.  

अमोल जाधव यांना निवडणूक लढवायची असली तरी त्यांच्या मागे कोणता राजकीय पक्ष नाही. लोकसभेसाठी त्यांना कुटुंबातील चार व्यक्तींचे उमेदवारी अर्ज भरायचे आहेत. यासाठी त्यांना 1 लाखापर्यंत खर्च येणार आहे. एकीकडे मराठा समाजाला ओबीसीमधुन आरक्षण मागणीसाठी समाज आक्रमक असताना दुसरीकडे मराठा तरुण निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत दिसत आहे. 

धाराशिव जिल्ह्यातुन 1 हजार उमेदवारी अर्ज

मराठा समाजाने धाराशिव लोकसभा निवडणूकीची तयारी सुरू केली आहे. यासाठी धाराशिव जिल्ह्यातुन 1 हजार उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत. त्या दृष्टीने तयारी देखील सुरू करण्यात आली आहे. उमेदवारी अर्जासाठी पैसै मिळावेत म्हणून धाराशिव तालुक्यातील कारी गावातील अमोल जाधव यांनी स्व:ताचे साडेतीन टन सोयाबीन शासकीय गोदामात तारण ठेवले. यातून त्यांना 1 लाख रुपये रक्कम कर्ज स्वरूपात मिळाली आहे.

सहकुटुंब लोकसभेला

यामध्ये घरातील अमोल जाधव यांच्यासह आई - वडील आणि पत्नी असे 4 उमेदवारी अर्ज लोकसभेला भरले जाणार आहेत. 

सरसकट मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज आक्रमक आहे. यासाठी मनोज जरांगे यांनी उपोषणदेखील केले. तसेच राज्य सरकारवर नाराजीदेखील व्यक्त केलीय. दरम्यान येणाऱ्या निवडणुकीत मराठा समाज सरकारला उत्तर देईल, असेही त्यांनी आपल्या जाहीर भाषणात वारंवार म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर मराठा तरुण जागोजागी उमेदवारी अर्ज भरुन सत्ताधारी पक्षांची कोंडी करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आ