Sharad Pawar Showing Collar Video: लोकसभेच्या सातारा मतदारसंघामधून लढण्यास श्रीनिवास पाटील यांनी नकार दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. शरद पवार गटाकडून श्रीनिवास पाटील यांनी उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र प्रकृतीचं कारण देत श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये चाचपणी करुन उमेदवाराची घोषणा करु असं आश्वासन शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिलं. दरम्यान दुसरीकडे, राज्यसभेचे खासदार तसेच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले नेते उदयनराजे भोसलेंना साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. याचसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांबरोबर चर्चाच करण्यासाठी मागील आठवडाभर उदयनराजे दिल्लीत ठाण मांडून होते. 3 दिवस ताटकाळत ठेवल्यानंतर अखेर अमित शाहांनी त्यांना भेट दिली. या भेटीनंतर साताऱ्यात परतल्यावर उदयनराजेंनी आपणच निवडणूक लढणार असं अगदी ठामपणे सांगितलं असलं तरी अद्याप भाजपाने त्यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही. दोन्ही बाजूकडील उमेदवारांसंदर्भात संभ्रम असल्याच्या मुद्द्यावरुन सातारा दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला शरद पवारांनी अगदी उदयनराजेंच्या स्टाइलमध्ये कॉलर उडवत उत्तर दिलं. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
पत्रकारांशी चर्चा करताना शरद पवारांना, उदयनराजेंना अजून महायुतीने उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे त्यांनी तुमच्याशी संपर्क साधल्यास त्यांच्याशी बोलणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवारांनी स्पष्ट शब्दांमध्ये अशी कोणतीही शक्यता नसल्याचं स्पष्ट केलं. 'शक्यताच नाही', 'अजिताबच नाही' असं म्हणत शरद पवारांनी उदयनराजेंशी तिकीटासंदर्भात चर्चेची कोणतीही शक्यता नसल्याचं स्पष्ट केलं. तिकीटासंदर्भात आपण उदयनराजेंशी चर्चा करणार नाही असं शरद पवारांनी सांगताच पत्रकारांनी, 'मग तुम्हीही कॉलर उडविणार का?' असा रंजक प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकताच शरद पवारांनी दोन्ही हातांनी आपली कॉल धरुन उडवून दाखवली. शरद पवारांचा हा हटके अंदाज पाहून पत्रकारांमध्ये एकच हसू पिकलं.
नक्की वाचा >> 'खैरेंचं काम करणार नाही, मी...'; उमेदवार यादीतून वगळल्यानंतर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया
उदयनराजे भोसले हे त्यांच्या स्टाइलसाठीही ओळखले जातात. आलिशान गाड्या असोत किंवा पत्रकार परिषदेत एखाद्या प्रश्नाला हटके स्टाइलने उत्तर देणं असो उदयनराजेंची शैली साताऱ्यामध्ये चर्चाचा विषय असते. अनेकदा उदयनराजेंनी विरोधकांना आव्हान देताना किंवा आपलं म्हणणं अघदी ठामपणे मांडताना कॉलर उडवल्याचं पाहायला मिळालं आहे. याच्याच संदर्भातून शरद पवारांना तुम्हीही उदयनराजेंनी तिकीटासाठी संपर्क केल्यास ऐटीत कॉलर उडवणार का? अशा अर्थाने प्रश्न विचारला होता. म्हणूनच शरद पवारांनी लगेच कॉलर उडवून दाखवली.
नक्की वाचा >> साताऱ्यात यंदा हाय-व्होल्टेज ड्रामा! शरद पवार विरुद्ध उदयनराजे भोसलेंमध्ये थेट लढत?
तुम्हीच पाहा त्यांचा हा व्हिडीओ...
1)
Video: उदयनराजेंना तुम्ही तिकीट देणार का? प्रश्न ऐकताच कॉलर उडवत शरद पवार काय म्हणाले पाहाhttps://t.co/428NsVSvzE < येथे वाचा सविस्तर वृत्त. नेमकं घडलं काय...#Satara #SharadPawar #udyanrajebhosale #Loksabha #LokSabhaElection2024 #LokSabhaElection #LokSabha2024 #Maharashtra… pic.twitter.com/MDYO2zQK3P
— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 30, 2024
2)
श्री. शरद पवार साहेबांनचा बाले किल्ला "सातारा जिल्हा".#राजधानी_सातारा pic.twitter.com/CpGRoSqnKW
— Swapnil Taware (@SwapnilSpeaks93) March 29, 2024
उदयनराजेंचं सातारा शहराने अगदी जंगी स्वागत केल्याचं मी 2 दिवसांपूर्वी पाहिलं. ते भाजपामध्ये असल्याने ते आमच्याशी संपर्क साधण्याचा विषयच नाही, असंही शरद पवार म्हणाले.