रामटेक : लोकसभा निवडणुकीसाठी रामटेक मतदारसंघात पहिल्या टप्प्यामध्ये ११ एप्रिलला मतदान होणार आहे. राज्यामध्ये भाजप-शिवसेनेची युती तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातून भाजप-शिवसेना युतीने सगळ्या १० जागांवर विजय मिळवला होता. आता या निवडणुकीत पुन्हा एकदा असाच करिश्मा होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
या निवडणुकीत रामटेक मतदारसंघात शिवसेनेकडून कृपाल तुमाणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कृपाल तुमाणे यांच्यासमोर काँग्रेसच्या किशोर गजभिये यांचं आव्हान असेल. तर वंचित बहुजन आघाडीने किरण रोडगे यांना उमेदवारी दिली आहे.
२०१४ सालच्या निवडणुकीमध्ये कृपाल तुमाणे यांनी काँग्रेसच्या मुकुल वासनिक यांचा १,७५, ७९१ मतांनी पराभव केला होता.
उमेदवार |
पक्ष |
मिळालेली मतं |
कृपाल तुमाणे | शिवसेना | ५,१९,८९२ |
मुकुल वासनिक | काँग्रेस | ३,४४,१०१ |
किरण रोडगे | बसपा | ९५,०५१ |
प्रताप गोस्वामी | आप | २५,८८९ |
गौतम वासनिक | अपक्ष | ६,३५३ |