नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी नागपूर मतदारसंघात पहिल्या टप्प्यामध्ये ११ एप्रिलला मतदान होणार आहे. राज्यामध्ये भाजप-शिवसेनेची युती तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातून भाजप-शिवसेना युतीने सगळ्या १० जागांवर विजय मिळवला होता. आता या निवडणुकीत पुन्हा एकदा असाच करिश्मा होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
या निवडणुकीत नागपूर मतदारसंघात भाजपकडून नितीन गडकरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नितीन गडकरी यांच्यासमोर काँग्रेसच्या नाना पटोले यांचं आव्हान असेल.
२०१४ साली नागपूरमधून नितीन गडकरी यांनी काँग्रेसच्या विलास मुत्तेमवार यांचा २,८४,८२८ मतांनी पराभव केला होता.
उमेदवार |
पक्ष |
मिळालेली मतं |
नितीन गडकरी | भाजप | ५,८७,७६७ |
विलास मुत्तेमवार | काँग्रेस | ३,०२,९१९ |
मोहन गायकवाड | बसपा | ९६,४३३ |
अंजली दमानिया | आप | ६९,०८१ |
नोटा | ३,४६० |