परभणी : लोकसभा निवडणुकीसाठी परभणी मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यामध्ये १८ एप्रिलला मतदान होणार आहे. राज्यामध्ये भाजप-शिवसेनेची युती तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. या निवडणुकीत परभणी मतदारसंघातून शिवसेनेनं संजय जाधव यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर हे संजय जाधव यांच्याविरोधात उभे आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून आलमगिर खान अखिल मोहम्मद खान निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
२०१४ साली परभणीमधून शिवसेनेच्या संजय जाधव यांचा विजय झाला होता. संजय जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजय भंबाळे यांचा १,२७,१५५ मतांनी पराभव केला होता.
उमेदवार |
पक्ष |
मिळालेली मतं |
संजय जाधव |
शिवसेना | ५,७८,४५५ |
विजय भंबाळे | राष्ट्रवादी काँग्रेस | ४,५१,३०० |
गुलमीर खान | बसपा | ३३,७१६ |
नोटा | १७,५०२ | |
राजन कोमराडे | सीपीआय | १२,४०४ |