उस्मानाबाद : लोकसभा निवडणुकीसाठी उस्मानाबाद मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यामध्ये १८ एप्रिलला मतदान होणार आहे. राज्यामध्ये भाजप-शिवसेनेची युती तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. या निवडणुकीत उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेनेकडून ओमराजे निंबाळकर यांना तर राष्ट्रवादीकडून राणा जगजीतसिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून अर्जुन सलगर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
२०१४ साली उस्मानाबादमधून शिवसेनेच्या रवींद्र गायकवाड यांनी राष्ट्रवादीच्या पद्मसिंह पाटील यांचा २,३४,३२५ मतांनी पराभव केला होता. यावेळी मात्र शिवसेनेनं रवींद्र गायकवाड यांच्याऐवजी ओमराजे निंबाळकर यांना तिकीट दिलं आहे.
उमेदवार |
पक्ष |
मिळालेली मतं |
रवींद्र गायकवाड | शिवसेना | ६,०७,६९९ |
पद्मसिंह पाटील | राष्ट्रवादी काँग्रेस | ३,७३,३७४ |
पद्मशील ढाले | बसपा | २८,३२२ |
रोहन देशमुख | अपक्ष | २६,८६८ |
तुकाराम गंगावणे | अपक्ष | १०,२१० |