भंडारा : भंडारा-गोंदिया मतदारसंघातून भाजपच्या सुनील मेंढेंचा विजय झाला आहे. सुनील मेंढेंनी राष्ट्रवादीच्या नाना पंचबुद्धेंचा पराभव केला. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातून भाजप-शिवसेना युतीने सगळ्या १० जागांवर विजय मिळवला होता. यावेळी मात्र युतीला विदर्भातल्या दोन जागा गमवाव्या लागल्या.
अमरावती मतदारसंघातून नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसुळ यांचा पराभव केला आहे. शिवसेना-भाजप युतीने विदर्भातली गमावलेली ही दुसरी जागा आहे. याआधी चंद्रपूर मतदारसंघातून काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांनी भाजपच्या हंसराज अहिर यांचा पराभव केला.
हंसराज अहिर हे केंद्रामध्ये राज्य मंत्री होते. याआधी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांचा रायगडमधून राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरे यांनी पराभव केला.
भंडारा-गोंदिया मतदारसंघात भाजपकडून नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मेंढे यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाना पंचबुद्धे यांच्याशी झाला. नाना पंचबुद्धे हे राष्ट्रवादीचे भंडारा जिल्हाध्यक्ष आहेत. वंचित बहुजन आघाडीने एन के न्हाने यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आहे.
२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातून भाजप-शिवसेना युतीने सगळ्या १० जागांवर विजय मिळवला होता.
२०१४ सालच्या निवडणुकीमध्ये भंडारा-गोंदियातून भाजपच्या नाना पटोले यांनी राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांचा १,४९,२५४ मतांनी पराभव केला होता. पण खासदारपदाचा आणि भाजपचा राजीनामा देऊन नाना पटोले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता काँग्रेसने नाना पटोले यांना नागपूरमधून तिकीट दिलं आहे.
उमेदवार |
पक्ष |
मिळालेली मतं |
नाना पटोले | भाजप | ६,०६,१२९ |
प्रफुल्ल पटेल | राष्ट्रवादी काँग्रेस | ४,५६,८७५ |
संजय नासरे | बसपा | ५०,९५८ |
धनू वलथारे | अपक्ष | १०,१३३ |
मोरेश्वर मेश्राम | अपक्ष | १०,१२७ |
२०१९ लोकसभा निवडणुकीचा लाईव्ह निकाल पाहण्यासाठी तुमच्या मतदारसंघावर क्लिक करा.