अनंत गीते म्हणजे संसदेतले मौनी सभासद, शरद पवारांची टीका

अनंत गीते म्हणजे संसदेतले मौनी सभासद अशी टीका पवार यांनी गुहागर येथे जाहीर सभेत केली. 

Updated: Apr 14, 2019, 08:49 AM IST
अनंत गीते म्हणजे संसदेतले मौनी सभासद, शरद पवारांची टीका title=

रायगड : लोकसभा निवडणूकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना खासदार अनंत गिते यांच्यावर टीका केली आहे. अनंत गीते म्हणजे संसदेतले मौनी सभासद अशी टीका पवार यांनी गुहागर येथे जाहीर सभेत केली. रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेकाप-आरपीआय(कवाडे गट) माहाआघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ आज पवारांची सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते.

Image result for anant gite zee news

यावेळी उमेदवार सुनील तटकरे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, आमदार भास्कर जाधव, आमदार संजय कदम, शेखर निकम, कुमार शेट्ये यांच्यासह माहाआघाडीचे पदाधिकारी तसेच हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

Image result for sunil tatkare zee news

 गीतेंना तुम्ही 6 वेळा निवडून दिलेत. मी गेली अनेक वर्ष संसदेत आहे, मात्र मी संसदेत अशी एक व्यक्ती पाहिली की खासदार म्हणून त्यांनी कोकणच्या, महाराष्ट्राच्या प्रश्नांवर तोंड उघडलं नाही.. तसेच आता सत्तेची ताकद असताना सुद्धा काही केले नसल्याची सडकून टीका यावेळी पवार यांनी अनंत गीतेंवर केली.