Maharashtra Breaking News Today LIVE Updates: चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील सावली शहराजवळ बस कोसळली

Maharashtra Breaking News 1st December 2024 LIVE Updates: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा  

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील सावली शहराजवळ बस कोसळली

1 Dec 2024, 09:40 वाजता

दोन महिन्यांत मुंबई एअरपोर्टवर 63 कोटींचा गांजा जप्त

बँकॉक येथून मुंबईत अमली पदार्थांच्या तस्करीत वाढ होत असून, गेल्या दोन महिन्यांत मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाने 11 प्रकरणांत 63 कोटी रुपयांचा गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी आतापर्यंत 11 लोकांना अटक करण्यात आली आहे. तस्करी होत असलेल्या अमली पदार्थांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे गांजाचे आहे. ऑक्टोबर महिन्यात सीमा शुल्क विभागाने सात प्रकरणांत 25 कोटी 66 लाख रुपयांचा गांजा जप्त करत 7 लोकांना अटक केली होती. नोव्हेंबर महिन्यात 32 कोटी 29 लाख रुपयांचा गांजा जप्त करत चार लोकांना अटक केली आहे. बँकॉक येथून मोठ्या प्रमाणावर मुंबईत गांजा आल्यानंतर याचे सूत्रधार कोण आहेत आणि हे रॅकेट कोण चालवत आहेत, याचा आता अधिकारी तपास करत आहेत.

1 Dec 2024, 09:38 वाजता

एटीएम मशीनचा शॉक लागून एकाच मृत्यू

फेंगल चक्रीवादळ शनिवारी साडेसात वाजता तामिळनाडू व पुदुचेरीच्या समुद्रकिनाऱ्यावर शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास धडकले. या कालावधीत तामिळनाडूतील उत्तर भागात व पुदुचेरी येथे शनिवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. चेन्नईत एका एटीएमजवळ शॉर्ट सर्किटमुळे विजेचा झटका लागल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. त्याचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. याशिवाय प्राणहानीचे वृत्त नाही. चक्रीवादळामुळे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

1 Dec 2024, 09:36 वाजता

निफाड 10 अंश सेल्सिअसवर

निफाडचा पारा 10 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. निफाडच्या तापमानात किंचितशी वाढ झाली आहे. कालपेक्षा 3 अंश सेल्सिअसने वाढ झाल्याचं दिसून येत आहे. काल निफाडचा पारा होता 7 अंश सेल्सिअसवर होता.