Maharashtra Breaking News Today LIVE Updates: चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील सावली शहराजवळ बस कोसळली

Maharashtra Breaking News 1st December 2024 LIVE Updates: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा  

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील सावली शहराजवळ बस कोसळली

1 Dec 2024, 10:09 वाजता

मुख्यमंत्री दुपारी 2 वाजता दरेगावाहून रवाना होणार

मुख्यमंत्री दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दरेगावाहून निघणार आहे. ते दरेगावाहून ठाण्याकडे रवाना होणार आहेत. 

1 Dec 2024, 10:06 वाजता

चकमकीत सात माओवादी ठार

तेलंगणमधील मुलुगु जिल्ह्यातील एतुरुनगरम जंगल परिसरात सुरक्षारक्षकांसोबत झालेल्या चकमकीत सात माओवादी ठार झाले. यासंदर्भातील माहिती मुलुगु जिल्ह्याचे एसपी डॉ. शबरिश यांनी दिली. 

1 Dec 2024, 10:06 वाजता

बारामती : युगेंद्र पवारांनी फेर मत पडताळणीसाठी केला अर्ज

युगेंद्र पवारांनी मत पडताळणीसाठी अर्ज केला आहे. अजित पवार यांच्या विरोधात बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार हे उमेदवार होते. पराभव झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी मत पडताळणीसाठी अर्ज केलेला आहे.

1 Dec 2024, 10:03 वाजता

पुण्यातील 11 मतदारसंघांमध्ये EVM फेरतपासणीसाठी अर्ज

विधानसभा निवडणुकीत मतमोजणीत घोळ झाल्याच्या आरोपानंतर पुणे जिल्ह्यातील तब्बल 11 मतदारसंघांतील पराभूत उमेदवारांनी मतदान यंत्रांची पडताळणी करण्यासाठी अर्ज केला आहे. या 11 उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 8 आणि काँग्रेसच्या 3 उमेदवारांचा समावेश आहे. शिरूरमधील अशोक पवार, बारामतीतील युगेंद्र पवार, हडपरसमधील प्रशांत जगताप, चिंचवडमधील राहुल कलाटे, खडकवासलामधील सचिन दोडके, पर्वतीमधील अश्विनी कदम, भोसरीमधील अजित गव्हाणे, तर दौंडमधील रमेश थोरात यांचा समावेश आहे. तर पुणे कॅन्टोन्मेंटमधील रमेश बागवे, पुरंदरमधील संजय जगताप आणि भोरमधील संग्राम थोपटे यांनीही अर्ज केला आहे. पडताळणी करण्यासाठी प्रत्येकी 42 हजार 500 रुपये अधिक 18 टक्के जीएसटी आकारून एकूण 47 हजार 200 रुपये आकारले जातात. त्यानुसार या सर्व उमेदवारांनी 64 लाख 66 हजार 400 रुपये जिल्हा निवडणूक शाखेकडे जमा केले आहेत.

1 Dec 2024, 10:03 वाजता

पॉर्नोग्राफी प्रकरणात ED चे राज कुंद्राला समन्स; पुढच्या आठवड्यात...

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉर्नोग्राफी प्रकरणामध्ये ईडीने राज कुंद्राला समन्स जारी केले आहेत. या प्रकरणाशी संबंधित अन्य लोकांनाही समन्स बजावण्यात आले आहेत. या प्रकरणी पुढील आठवड्यामध्ये चौकशी होणार आहे. 

1 Dec 2024, 09:59 वाजता

मुंबईत गारठा वाढल्याने विजेच्या मागणीत घट; दैनंदिन मागणी 2500 मेगावॉटपर्यंत

आठवडाभरापासून तापमानाचा पारा घसरत असून मुंबईतील विजेची मागणीही कमी झाली आहे. गारठा वाढल्यामुळे एसी, पंखे, कुलरसाठी विजेचा होणारा वापर कमी झाला आहे. त्यामुळे शनिवारी मुंबईतील मागणी तीन हजार मेगावॉटवरून अडीच हजार मेगावॉटपर्यंत घटली आहे.

1 Dec 2024, 09:59 वाजता

कुर्ला डेपोजवळ खड्ड्यात पडून 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

कुर्ला डेपो मध्ये सुरू असलेल्या विकासकामांसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून एका 7 वर्षीय वयाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. उज्ज्वल रवी सिंग असे या मयत मुलाचे नाव असून तो बाजूच्या वत्सला ताई नाईक नगर या विभागात राहतो. काल दुपारी त्याच्या मित्रांसह कुर्ला डेपो च्या आत खुल्या जागेत खेळण्यास आला असताना घडली घटना. या वेळी तिथे इमारतीच्या निर्मितीसाठी खोदण्यात आलेल्या आणि पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला आहे. उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच नेहरू नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या बाबत अपमृत्यूची नोंद केली आहे.

1 Dec 2024, 09:57 वाजता

महापरिनिर्वाण दिनानिमित्त फलाट तिकीट विक्री बंद

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी फलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यानुसार फलाट तिकिटांच्या विक्रीवर 2 ते 9 डिसेंबरपर्यंत निर्बंध घातले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशविदेशातील लाखो अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येतात. त्यामुळे रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर प्रचंड गर्दी होते. त्यामुळे फलाटांवरील गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने लांब पल्ल्यांच्या स्थानकांवर फलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

1 Dec 2024, 09:56 वाजता

अनिल परब यांच्यासह 48 जण निर्दोष मुक्त

नारायण राणे यांच्या सेना त्यागानंतरची धुमश्चक्री भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर प्रभादेवी येथे झालेल्या धुमश्चक्रीप्रकरणी शिवसेना नेते अनिल परब, श्रद्धा जाधव, मनसेचे बाळा नांदगावकर, शिंदेसेनेचे सदा सरवणकर आणि अन्य राजकीय नेत्यांची न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. विशेष न्यायालयाच्या न्यायमूर्ती आदिती कदम यांनी शनिवारी परब, नांदगावकर, सरवणकर यांच्यासह 48 जणांची या खटल्यातून निर्दोष सुटका केली.

1 Dec 2024, 09:56 वाजता

लालपरीचा प्रवास महागणार? 14% भाडेवाढीचा प्रस्ताव

एसटी महामंडळाने नागरिकांच्या खिशाला कात्री लावण्याची तयारी सुरू केली आहे. मागील तीन वर्षांत भाडेवाढ करण्यात आली नाही, असे सांगत तब्बल 14.13 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर यावर शिक्कामोर्तब होईल. दरवाढीचा हाच टक्का कायम ठेवल्यास आज असलेल्या 100 रुपयांच्या तिकिटामागे 15 रुपये जादा मोजावे लागतील. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च भागत नसल्यामुळे महामंडळाने - भाडेवाढीचा प्रस्ताव पुढे आणला.