Maharashtra Breaking News Today LIVE Updates: चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील सावली शहराजवळ बस कोसळली

Maharashtra Breaking News 1st December 2024 LIVE Updates: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा  

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील सावली शहराजवळ बस कोसळली

1 Dec 2024, 14:59 वाजता

जयंत पाटलांची गटनेतेपदी निवड होणार?

शरद पवारांनी पक्षाच्या आमदारांची थोड्याच वेळात मुंबईतील पक्षकार्यालयात बैठक होणार आहे. बैठकीसाठी शरद पवार दाखल झाले आहेत. बैठकीत पक्षाचा गटनेता, विधीमंडळ पक्षनेता आणि मुख्य प्रतोद यांची निवड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. तर गटनेते पदी जयंत पाटील यांची तर प्रतोदपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड होण्याची शक्यता सूत्रांनी दिलीय. 

 

1 Dec 2024, 14:48 वाजता

सागर बंगल्यावर हालचाली वाढल्या, बावनकुळे फडणवीसांच्या भेटीला

महायुतीचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदानावर होणार आहे. या दरम्यान सागर बंगल्यावर हालचाली वाढल्याच पाहिला मिळत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. 

1 Dec 2024, 14:08 वाजता

बार्शीत विचित्र चोरी! ATM मधील CCTV वर स्प्रे मारुन 23 लाख लुटले

सोलापूरमधील बार्शी शहरात एटीएम फोडून मोठी रक्कम लंपास करण्यात आली आहे. बार्शी शहरातील परांडा रोडवरील एसबीआय एटीएम फोडून 23 लाख रुपयांची रक्कम चोरल्याची घटना समोर आली आहे. रविवारी पहाटेच्या चार वाजताच्या सुमारास एसबीआय बँक एटीएमचे शटर तोडून एटीएम फोडण्याची घटना घडली. एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरावर चोरट्यांनी स्प्रे मारुन घटना रेकॉर्ड होणार नाही याची काळजी घेतली. शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठी घटना घडल्यामुळे बार्शी शहरात खळबळ उडाली आहे. बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे. 

1 Dec 2024, 13:25 वाजता

अशोक चव्हाण खासदार फडणवीसांच्या भेटीसाठी 'सागर'वर

भाजपचे खासदार अशोक चव्हाण, खासदार धनंजय महाडिक आणि भाजप नेते प्रशांत परिचारक देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत.

1 Dec 2024, 12:42 वाजता

फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना फोन

भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीसांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन केला आहे. फडणवीसांनी  शिंदेंच्या प्रकृतीची विचारपूस केली. एकनाथ शिंदे प्रकृती अस्वास्थ्यामुळे दरे गावात विश्रांतीसाठी गेले आहेत. शिंदे आजच ठाण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

1 Dec 2024, 12:05 वाजता

भारताची लोकसंख्या कमी होत आहे ही चिंतेची बाब: सरसंघचालक मोहन भागवत

समाजाकरता कुळाचा त्याग करायचा आणि कुळाकरता एका व्यक्तीचा त्याग करायचा असतो. कुटुंब हा समाजाचा घटक आहे, असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये बोलताना केलं आहे. जनसंख्या कमी होते हे चिंतेचा विषय आहे. आपल्या देशाची जनसंख्या वाढ ही 2.1 पेक्षा कमी नको, हे टिकलं पाहिजे. चांगलं वाईट नंतर ठरवू. आपल्या संस्कृतीची जगाला गरज आहे. सगळे सुखी व्हावे याकरता हा धर्म आहे. जातपात भेद करायला नको. शास्त्रात याला स्थान नाही, असंही भागवत म्हणाले. 

1 Dec 2024, 11:58 वाजता

शरद पवारांच्या भेटीसाठी संजय राऊत YB सेंटरमध्ये दाखल

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत शरद पवार यांच्या भेटीला यशवंतराव भवन सेंटर येथे दाखल झाले आहेत. पवार आणि राऊत यांच्यात मत फळणीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. या आधी झालेल्या शरद पवार यांच्या पक्षाच्या बैठकीत वकिलांची टीम तयार करण्याचा निर्णय झाला होता. ईव्हीएमवरुन उमेदवारांनी केलेल्या तक्रारींवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे.

1 Dec 2024, 11:55 वाजता

जयकुमार रावळ आणि रवी राणा देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी 'सागर' बंगल्यावर दाखल झाले आहेत.

1 Dec 2024, 11:07 वाजता

शरद पवारांनी बोलावली पक्षाच्या आमदारांची बैठक

शरद पवारांनी त्यांच्या पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची आज दुपारी 3 वाजता मुंबईतील पक्ष कार्यालयात बैठक बोलावली आहे. आज होणाऱ्या बैठकीत गटनेता, विधीमंडळ पक्ष नेता आणि मुख्य प्रतोद यांची निवड होण्याची शक्यता आहे. गटनेतेपदी जयंत पाटील यांची तर प्रतोदपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षाचे प्रमुख शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे.

1 Dec 2024, 10:09 वाजता

नव्या सरकारच्या पहिल्या अधिवेशनाची तारीख ठरली

महायुती सरकारच्या पहिल्या अधिवेशनाची तारीख ठरली आहे. नव्या सरकारचं पहिलं अधिवेशन नागपूरला 16 ते 21 डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे. नव्याने निवडून आलेल्या सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन कमी दिवसांचे असणार आहे. विधानसभेत पहिल्यांदाच विरोधीपक्ष नेता नसेल.