1 Dec 2024, 20:25 वाजता
मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी फुटली
रायगड येथून महत्वाचे वृत्त समोर येत आहे. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी फुटली आहे.या महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे. आता केवळ माणगाव शहरात मंदगतीने वाहने पुढे सरकत आहेत.
1 Dec 2024, 19:54 वाजता
पालघरमध्ये मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
मनसेचे पालघर जिल्हाध्यक्ष समीर मोरे आणि त्यांच्या भावाला जबर मारहाण करण्यात आली आहे. समीर मोरे यांच्या भावावर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडून हल्ला करण्यात आल्याचा मोरे कुटुंबीयांचा आरोप आहे. समीर मोरे आणि त्यांच्या भावावर बोईसरमधील शगुन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
1 Dec 2024, 19:20 वाजता
मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार- जरांगे
मनोज जरांगे यांचे या पुढचे आंदोलन मुंबई येथील आझाद मैदानावर होण्याची शक्यता आहे. तुळजाभवानीच्या मंदिरातून जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे. सरकार कुणाचंही असलं तरीही मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार असे जरांगे पाटील म्हणाले.
विधानसभा निवडणूक लढविण्याचा फॉर्मुला जुळला नाही नाहीतर सुफडा साफ केला असंही ते म्हणाले.
1 Dec 2024, 18:48 वाजता
मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा
मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. माणगाव बाजार पेठ ते मुगवली फाटा इथंपर्यंत वाहतूक ठप्प झाली असून जवळपास 4 किलोमीटर पर्यंत वाहने रांगेत उभी आहेत. कोकणात आलेले पर्यटक परतीच्या मार्गावर असून पर्यटकांच्या परतीच्या प्रवासात वाहतूक कोंडीचे विघ्न आले. तर वाहतुकीची ही कोंडी दूर करताना वाहतूक पोलिसांची दमछाक होतेय.
1 Dec 2024, 17:26 वाजता
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते म्हणून जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती
शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक रविवारी पार पडली. यात गटनेते म्हणून जितेंद्र आव्हाड यांना नियुक्त केले आहे तर मुख्य प्रतोद म्हणून रोहित आर आर पाटील यांची तर प्रतोद म्हणून उत्तम जानकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. विधिमंडळ पक्षनेत्याची निवड नंतर केली जाईल असं बैठकीनंतर जयंत पाटील यांनी सांगितले.
1 Dec 2024, 17:19 वाजता
एकनाथ शिंदे ठाण्यात दाखल
दरे गावातून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात दाखल झाले आहेत. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने ठाण्यात परतले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत श्रीकांत शिंदेही होते.
1 Dec 2024, 17:12 वाजता
पुण्यातील शिक्रापूरच्या माजी उपसरपंचाची हत्या
पुण्याच्या शिक्रापूरमध्ये माजी उपसरपंचावर अज्ञात तरुणाने धारदार शास्त्राने वार करत निर्घन पने हत्या केलीये.. दत्ता गिलबिले असं हल्ला झालेल्या मृत माजी उपसरपंचाचे नाव आहे.. हत्येचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. या हल्ल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे..हत्येप्रकरणी शिक्रापूर पोलीस अधिक तपास करत आहेत...
1 Dec 2024, 15:59 वाजता
अविनाश जाधव यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा दिला राजीनामा
विधानसभा निवडणुकीत ठाणे आणि पालघर येथे पराभवाची जबाबदारी घेऊन मी माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे काम करताना माझ्याकडून कळत नकळत काही चूक झाली असल्यास आपण मला माफ करावे असे पत्र लिहत दिला राजीनामा..
बातमी सविस्तर वाचा - 'चूक झाली असल्यास..'; राज ठाकरेंना मोठा धक्का! आधी सगळे उमेदवार पडले अन् आता 'हा' लेटरबॉम्ब
1 Dec 2024, 15:53 वाजता
जनतेच्या मनातलं सरकार स्थापन होणार- शिंदे
दरे गावातून निघण्यापूर्वी एकनाश शिंदे हे पत्रकारांशी बोलले. ते म्हणाले की, जनतेच्या मनातलं सरकार स्थापन होणार आहे. तिघे एकत्र बसून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिपदांबाबत निर्णय घेणार आहेत. सरकार स्थापन करताना गावी जायचं नाही का?, सवालही शिंदेंनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना विचारला.
1 Dec 2024, 15:02 वाजता
एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने ठाण्यात येणार
मूळगावी दरे इथे गेलेले काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने ठाण्याला येणार आहे. थोड्याच वेळात एकनाथ शिंदे ठाण्यासाठी रवाना होणार आहेत. दरे गावातल्या मुळ घरातून एकनाथ शिंदे बाहेर पडले असून ग्रामदैवताचं दर्शन घेऊन हेलिकॉप्टरने ठाण्याच्या दिशेने निघणार आहेत.