Deemed Conveyance : ओसी नसल्यावरही डीम्ड कन्व्हेयन्स मिळणार

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.  

Deemed Conveyance : ओसी नसल्यावरही डीम्ड कन्व्हेयन्स मिळणार

ओसीशिवाय डीम्ड कन्व्हेयन्स मिळणार

 

Deemed Conveyance : बिल्डिंग बांधून ती रहिवाशांच्या ताब्यात दिली की ती जागा सोसायटीच्या नावावर करायची असते. मात्र अनेक बिल्डर्स ओसीचं कारण देत डिम्ड कन्व्हेयन्स(Deemed Conveyance) देत नाहीत, त्यामुळे पुनर्विकासात ब-याच अडचणी येतात. ब-याचवेळा डीम्ड कन्व्हेयन्ससाठी रहिवाशांकडून पैसेही उकळले जातात  मात्र आता ओसी नसल्यावरही यापुढे डीम्ड कन्व्हेयन्स मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा राज्यातल्या लाखो जुन्या इमारतींना फायदा होणार आहे. 

बातमी पाहा - https://bit.ly/3jOAhO8

 

9 Feb 2023, 11:59 वाजता

चिंचवड, कसबा पोटनिवडणूक रद्द होऊ शकते- असीम सरोदे

Asim Sarode  : चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक रद्द होऊ शकते असं मोठं विधान घटनातज्ज्ञ असीम सरोदेंनी केलंय.. सुप्रीम कोर्टात 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी सुरु आहे.. जर 16 आमदार अपात्र ठरले तर विधानसभा भंग होऊन पोटनिवडणूक रद्द होईल असं सरोदेंनी म्हटलंय..

9 Feb 2023, 11:46 वाजता

डिस्ने जगभरातून 7 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार

Disney Cost Cutting : आयटी कंपन्यांनंतर आता मीडिया कंपनी डिस्नेमध्येही मोठी नोकरकपात होणार आहे.. डिस्ने जगभरातून 7 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे.. वॉल्ट डिस्नेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बॉब इगर यांनी ही माहिती दिलीय.. 5.5 अब्ज डॉलर्सचा खर्च वाचवण्यासाठी आणि व्यवसाय फायदेशीर बनवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं कंपनीने म्हटलंय.. गेल्या 5 वर्षांमधली डिस्नेची ही तिसरी नोकर कपात आहे. 2018 मध्ये पहिली नोकरकपात झाली होती. त्यानंतर 2020 मध्ये 32 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आलं होतं. आता 7 हजार कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागेल.

9 Feb 2023, 11:07 वाजता

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला ग्रीन सिग्नल 

Bullet Train :  मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनला ग्रीन सिग्नल मिळालंय. मुंबई हायकोर्टाने गोदरेजची याचिका फेटाळली. विक्रोळीच्या जमीन अधिग्रहणाला गोदरेजचं आव्हान. गोदरेजची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली.

9 Feb 2023, 10:31 वाजता

Sanjay Raut Live | Marathi News LIVE Today : 'विरोधी पक्षाबाबत षडयंत्र रचलं जातंय का?','गृहमंत्र्यांनी वेळीच पावलं उचलावीत','सुरक्षा काढण्यामागची कारणं काय?', खासदार संजय राऊत यांचा राज्य सरकारला सवाल.

बातमी पाहा- नाना पटोले यांच्यामुळे मविआ सरकार कोसळलं? संजय राऊत यांच्या वक्तव्याचा अर्थ काय?

9 Feb 2023, 10:27 वाजता

Sanjay Raut Live | Marathi News LIVE Today : 'महाराष्ट्रातील जनता भीतीच्या छायेखाली','आदित्य ठाकरेंवरही हल्ला झाला', 'राज्य सरकारचं अस्तित्व नाही', 'प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला','सरकारनं दखल घ्यावी अन्यथा फटका बसेल', खासदार संजय राऊत यांचा राज्य सरकारला टोला 

 

9 Feb 2023, 09:18 वाजता

त्र्यंबकेश्वरच्या गाभाऱ्यात अमरनाथ प्रकटल्याचा दावा खोटा

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वराच्या गर्भगृहातील शिवपिंडीत बाबा अमरनाथप्रमाणे बर्फ तयार झाल्याचा व्हिडिओ गेल्या वर्षी समोर आला होता...पिंडीवर बर्फ कसा तयार झाला याची आता माहिती समोर आलीय...पिंडीत बर्फ साचल्याने बाबा अमरनाथ (Baba Amarnath )प्रकट झाल्याचा दावा साफ खोटा असल्याचं तपासात समोर आलंय...मंदिरातील पुजा-यानेच दोन सहका-यांच्या मदतीने पिशवीत बर्फ नेऊन तो पिंडीवर ठेवल्याचं निष्पन्न झालंय.

9 Feb 2023, 09:11 वाजता

धाराशिवमध्ये उरुसात वळू उधळल्यानं चेंगराचेंगरी

Dharashiv Valu : धाराशिवमध्ये उरुसात वळू उधळल्याची घटना समोर आलीय...ही दृष्य पाहिल्यानंतर स्पेनमधील स्पॅनिश बूल फायटिंग डोळ्यासमोर येईल...धाराशिव शहरातील हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे यांच्या उरुसाच्या धार्मिक कार्यक्रम सुरू होता...यावेळी अचानक वळू उधळला...कार्यक्रमात हजारोंची गर्दी असल्याने लोकांनी पळापळ झाली...वळू सैरावैरा पळू लागल्याने चेंगराचेंगरी झाली...यात 14 भाविक जखमी झालेयत...त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत...मध्यरात्री 3 च्या सुमारास ही घटना घडली...या धार्मिक कार्यक्रमात जवळपास 15 हजार भाविक उपस्थित होते अशी माहिती मिळलेयत...घटनेवेळी पोलीस आणि वैद्यकीय पथक तात्काळ हजर झाल्याने गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं...तर जखमीवर उपचार करण्यात आले...या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

बातमी पाहा- उरुसामध्ये वळू उधळला! प्रचंड चेंगराचेंगरी; 14 जण गंभीर जखमी

9 Feb 2023, 08:26 वाजता

फ्रान्सच्या टोटल एनर्जीचा अदानींना मोठा झटका

Adani Group : फ्रान्सच्या टोटल एनर्जी कंपनीने अदानींना मोठा झटका दिलाय... अदानींसोबतचा 50 अब्ज डॉलर्सचा प्रकल्प थांबवण्यात आलाय... 2030 पर्यंत 10 लाख टन हरित ऊर्जा निर्माण करण्याचं अदानी समूहाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी टोटल एनर्जी कंपनी अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये 25 टक्के इक्विटी घेणार होती. मात्र फ्रान्सच्या कंपनीने ही भागीदारी स्थगित केली.. हिंडनबर्ग रिपोर्टमधल्या गोष्टी स्पष्ट होईपर्यंत हायड्रोजन प्रकल्प थांबविला जाईल असं फ्रेंच कंपनीने म्हटलंय. 

9 Feb 2023, 08:04 वाजता

भारतात चीनची बलून हेरगिरी

Chinese Spy Balloons : चीनने अमेरिकेत बलून सोडल्याचं प्रकरण ताजं असताना आता नवी माहिती समोर आलीय...चीन अमेरिकेप्रमाणे भारतातही बलून हेरगिरी करत असल्याची धक्कादायक माहिती अमेरिकी संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलीय...भारतासह इतर काही देशात आकाशातून टेहळणी बलून सोडल्याचं समोर आलंय....सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या देशांमधील लष्करी तळे आणि संवेदनशील स्थळांची स्थिती अभ्यासण्यासाठी चीनने टेहळणी बलूनचा वापर केल्याची माहिती समोर आलीय...अमेरिकेसोबतच चीनने या देशांच्या सार्वभौम स्वातंत्र्याचा भंग केला आहे, असं अमेरिकेच्या संरक्षण विभागाचं म्हणणं आहे...याचीच माहिती देण्यासाठी अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने वॉशिंग्टनमधील 40 देशांच्या वकिलातींना एका गोपनीय बैठकीत दिल्याचेही या वृत्तात म्हटलंय...चीनकडून देशाच्या सार्वभौमतेला धोका निर्माण झाला तर योग्य कारवाई करू अशी भूमिका अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी घेतलीय... 

बातमी पाहा- चीन करतंय भारताची हेरगिरी! भारतावरही स्पाय बलून? अमेरिकेचा दावा

9 Feb 2023, 07:33 वाजता

केरळच्या ट्रान्सजेंडर जोडप्यानं दिला बाळाला जन्म 

Kerala Transgender Couple : केरळच्या ट्रान्सजेंडर जोडप्याने बाळाला जन्म दिलाय... तेव्हा झिया आणि जहाद पावल यांचं आई-बाबा होण्याचं स्वप्न साकार झालंय.. ट्रान्सजेंडर जोडप्याला अपत्यप्राप्ती होण्याची देशातली ही पहिलीच घटना आहे. कोझिकोडच्या सरकारी रुग्णालयात सिझेरियनद्वारे या जोडप्याने बाळाला जन्म दिला... जोडप्यासह बाळाचीही प्रकृती उत्तम असल्याची माहिती झिया आणि जहाद पावलने दिली आहे. नवजात अर्भकाच्या लिंगाची ओळख जाहीर करण्यास मात्र या जोडप्याने नकार दिलाय. 

बातमी पाहा- 'तो' आई बनला! भारताच्या पहिल्या ट्रान्समेलने दिला बाळाला जन्म; Gender मुलं मोठ झाल्यावर...