Deemed Conveyance : ओसी नसल्यावरही डीम्ड कन्व्हेयन्स मिळणार

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.  

Deemed Conveyance : ओसी नसल्यावरही डीम्ड कन्व्हेयन्स मिळणार

ओसीशिवाय डीम्ड कन्व्हेयन्स मिळणार

 

Deemed Conveyance : बिल्डिंग बांधून ती रहिवाशांच्या ताब्यात दिली की ती जागा सोसायटीच्या नावावर करायची असते. मात्र अनेक बिल्डर्स ओसीचं कारण देत डिम्ड कन्व्हेयन्स(Deemed Conveyance) देत नाहीत, त्यामुळे पुनर्विकासात ब-याच अडचणी येतात. ब-याचवेळा डीम्ड कन्व्हेयन्ससाठी रहिवाशांकडून पैसेही उकळले जातात  मात्र आता ओसी नसल्यावरही यापुढे डीम्ड कन्व्हेयन्स मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा राज्यातल्या लाखो जुन्या इमारतींना फायदा होणार आहे. 

बातमी पाहा - https://bit.ly/3jOAhO8

 

9 Feb 2023, 20:00 वाजता

राज्य काँग्रेसमध्ये मोठे फेरबदलाचे संकेत

Prithviraj Chavan : राज्य काँग्रेसमध्ये(Maharashtra Congress) मोठे फेरबदलाचे संकेत. राज्य काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल होणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण(Prithviraj Chavan) यांनी ‘झी २४ तास’ला दिलीय. रायपूरमधल्या राष्ट्रीय अधिवेशनानंतर हे फेरबदल होणार असल्याचं चव्हणांनी नमूद केलंय.

बातमी पाहा - https://bit.ly/3RNTV9t

9 Feb 2023, 19:09 वाजता

आरती करण्यास मनाई.. जमावबंदीचा आदेश, नागरिक संतप्त

 

Kanifnath Temple Issue : अहमदनगरच्या(Ahmednagar) राहुरी तालुक्यातील गुहे गावात प्रशासनाच्या निर्णयामुळे तणाव निर्माण झालाय. इथल्या मशिदीशेजारी असलेल्या कानिफनाथ मंदिरात(Kanifnath Temple) आरती करण्यास प्रशासनानं मनाई केलीय. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरलीय. 
गुहा गावातील संतप्त नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलं. हा वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे. दर गुरूवारी नागरिक कानिफनाथांची आरती करतात, मात्र जमावबंदीचा आदेश लागू केल्यामुळे मंदिरात आरती करण्यापासून प्रशासनाने स्थानिकांना रोखलं...यामुळे संतप्त नागरिकांनी गावाच्या वेशीजवळ ठिय्या मांडला. प्रशासन सामाजिक सलोखा जपण्याऐवजी बिघडवतंय असा आरोप गावक-यांनी केलाय. 

बातमी पाहा - https://bit.ly/3EhShrh

9 Feb 2023, 14:57 वाजता

PM Narendra Modi Live : 'देशातल्या नागरिकांचा विश्वास आम्ही जिंकला', 'आम्ही राजकीय फायदा-तोटा बघितला नाही', 'ऊर्जा क्षेत्रात देश प्रगतीपथावर', 'आम्ही कष्टांचा मार्ग निवडला', 'आम्ही तुष्टीकरण संपवलं', 'आम्ही सबका साथ, सबका विकास केला', 'समाजातल्या शेवटच्या घटकाचंही आम्ही कल्याणा करणार', 'आमच्या सरकारमध्ये खरी धर्मनिरपेक्षता',   'काँग्रेसला देश वारंवार नाकारतोय', पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य.

 

9 Feb 2023, 14:39 वाजता

PM Narendra Modi Live : 'आम्ही जनतेसाठी दिवस-रात्र मेहनत करू', 'देश विकासासाठी कटीबद्ध', 'आम्ही विकासकामं करून दाखवली',  '25 कोटीपेक्षा जास्त कुटुंबांना गॅस कनेक्शन दिले', 'सामान्य माणूस आज समाधानी', 'जनतेच्या प्रश्नांना काँग्रेसनं प्राधान्य दिले नाही', 'आम्ही दुर्गम भागात वीज पोहोचवली', 'स्वातंत्र्यानंतर आज जनता समाधानी आणि आनंदी', पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला टोला. 

9 Feb 2023, 14:34 वाजता

PM Narendra Modi Live : 'काँग्रेसला जनतेचे प्रश्न सोडवायचे नव्हते', 'जनतेच्या थेट खात्यात पैसे जमा होऊ लागले','27 लाख कोटी लोकांच्या खात्यात जमा झाले', 'लोकांची खाती उघडली, काँग्रेसचं खातं बंद झालं', 'काँग्रेसनं योजना अडकवल्या, लटकवल्या', पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल. 

9 Feb 2023, 14:28 वाजता

PM Narendra Modi Live : 'काँग्रेसला जनतेचे प्रश्न सोडवाचे नव्हते','11 कोटी घरांमध्ये नळातून पाणी आलं', 'पाणी समस्या सोडवण्यासाठी सरकारच्या अनेक योजना', '48 कोटी जनधन खाती उघडण्यात आली', 'कर्नाटकात 1 कोटी 70 लाख जनधन खाती उघडली', पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मल्लिकार्जुन खरगेंना उत्तर.

9 Feb 2023, 14:21 वाजता

PM Narendra Modi Live : राज्यसभेत पंतप्रधान मोदींचं भाषण, मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकरांची घोषणाबाजी.,मोदी-अदानी भाई भाईच्या राज्यसभेत घोषणा, 'कमळ उमलण्यात विरोधकांचंही योगदान', 'काँग्रेसनं कारभार करताना खड्डे पाडून ठेवले', 'काँग्रेसनं 6 दशकं बरबाद केली', पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

9 Feb 2023, 13:54 वाजता

पटोलेंनी राजीनामा दिल्यामुळे मविआ सरकार अस्थिर झाले- विजय वडेट्टीवार 

 

Vijay Wadettiwar on Nana Patole : नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला नको होता, त्यामुळे मविआ सरकार अस्थिर झाले असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय...पटोलेंनी राजीनामा दिला नसता तर महाविकास आघाडी सरकार कोसळलं नसतं म्हणत पटोलेंवर वडेट्टीवारांनी निशाणा साधलाय...आधीच थोरात-पटोले वाद सुरू असताना आता नव्या वादाला तोंड फुटलंय...यामुळे काँग्रेस नेते पटोलेंविरोधात एकवटल्याचं समोर आलंय...

9 Feb 2023, 13:08 वाजता

कसब्यामधलं काँग्रेसचं बंड शमलं 

Kasba Peth Bypoll Election : कसबा पोटनिवडणुकीतली बंडाळी शमवण्यात काँग्रेसला यश आलंय. काँग्रेस बंडखोर बाळासाहेब दाभेकर यांनी घेतला अर्ज मागे घेतला. बाळासाहेब दाभेकर यांचा अर्ज माघारी घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे, आमदार संग्राम थोपटे आणि काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी पाहा- काँग्रेसनं वाढवलं भाजपचं टेन्शन! बाळासाहेब दाभेकर यांची निवडणुकीतून माघार

 

9 Feb 2023, 12:27 वाजता

Ajit Pawar Live | Marathi News LIVE Today : प्रज्ञा सातवांवरील हल्ल्याचा अजित पवरांकडून निषेध ,'गृहमंत्र्यांनी हल्लेखोरावर कारवाई करावी''प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ला दुर्दैवी', विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं वक्तव्य.