Deemed Conveyance : ओसी नसल्यावरही डीम्ड कन्व्हेयन्स मिळणार

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.  

Deemed Conveyance : ओसी नसल्यावरही डीम्ड कन्व्हेयन्स मिळणार

ओसीशिवाय डीम्ड कन्व्हेयन्स मिळणार

 

Deemed Conveyance : बिल्डिंग बांधून ती रहिवाशांच्या ताब्यात दिली की ती जागा सोसायटीच्या नावावर करायची असते. मात्र अनेक बिल्डर्स ओसीचं कारण देत डिम्ड कन्व्हेयन्स(Deemed Conveyance) देत नाहीत, त्यामुळे पुनर्विकासात ब-याच अडचणी येतात. ब-याचवेळा डीम्ड कन्व्हेयन्ससाठी रहिवाशांकडून पैसेही उकळले जातात  मात्र आता ओसी नसल्यावरही यापुढे डीम्ड कन्व्हेयन्स मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा राज्यातल्या लाखो जुन्या इमारतींना फायदा होणार आहे. 

बातमी पाहा - https://bit.ly/3jOAhO8

 

9 Feb 2023, 07:27 वाजता

बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस नेते दिल्लीत

 

Balasaheb Thorat : काँग्रसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यामुळे पक्षात बदलाचे वारे वाहू लागलेयत...रायपूर येथे होणा-या राष्ट्रीय अधिवेशनानंतर राज्यस्तरावर मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय...प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि थोरात यांच्यातील वाद उघड झाल्यानंतर राज्यातील काही नेते दिल्लीत गेले असून, पक्षश्रेष्ठींकडून काय भूमिका घेतली जाऊ शकते याचा कानोसा घेतला जातोय...विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने चांगले यश मिळविले मात्र, नाशिकमधील सत्यजीत तांबेंनी केलेल्या बंडखोरीमुळे त्यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे बाळासाहेब थोरात दुखावलेत अशी पक्षात चर्चा आहे...मिळालेल्या माहितीनुसार थोरात राजीनामा मागे घेण्याच्या मनस्थितीत नाहीत...त्यामुळे दिल्लीस्तरावरही त्यांच्या राजीनाम्याची गंभीर दखल घेतली गेलीय...त्यामुळे राज्यस्थरावर काँग्रेसमध्ये बदल होण्याची शक्यताय...