Rajasthan Royals In Playoffs : क्रिकेटचा सामना कोणा एकाट्या खेळाडूच्या जिवावर जिंकता येत नाही, याचा प्रत्यय अनेकदा आला असावा. सामना जिंकण्यासाठी गरज असते सांघिक खेळाची... याचीच अनुभूती यंदाच्या आयपीएलमध्ये संजू सॅमसन अँड कंपनीने करून दिली आहे. राजस्थान रॉयल्स संघाने (Rajasthan Royals) सध्या सुरू असलेल्या सिझनमध्ये अफलातून कामगिरी करत 9 पैकी 8 सामने जिंकले.. दमदार सुरूवातीनंतर आता राजस्थानने प्लेऑफचं (Playoffs scenario) तिकीट जवळजवळ निश्चित केलंय. सध्या राजस्थानचा संघ पाईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी आहे. मात्र, खात्यात 16 अंक असून देखील राजस्थानचा संघ प्लेऑफमधून बाहेर पडू शकतो का? असा सवाल आता विचारला जात आहे. चला तर मग समीकरण असं असेल? जाणून घेऊया
राजस्थानसाठी प्लेऑफ अवघड?
राजस्थान रॉयल्सने यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली सुरूवात केल्या मजबूत पाया रोवलाय. पहिले 4 सामने खिशात घालून राजस्थाने पाईंट्स टेबलमध्ये आपलं स्थान मजबूत केलं होतं. आरआरकडे 8 सामन्याच्या विजयासह 16 पाईंट्स आहेत. तर राजस्थानला अजून 5 सामने खेळायचे आहेत. जर राजस्थान रॉयल्स टीम इथून सर्व सामने हरली, तर राजस्थानच्या खात्यात केवळ 16 गुणच असतील आणि सध्याच्या पाईंट्स टेबलवर 10 अंकासह चेतकाच्या नरजेने प्लेऑफवर नजर ठेऊन असलेले 5 संघ आहेत. त्यामुळे राजस्थान जर उर्वरित सर्व सामन्यात पराभूत झाली तर राजस्थानचा खेळ खल्लास होण्याची शक्यता आहे.
पाईंट्स टेबलमधील केकेआर, चेन्नई, हैदराबाद, लखनऊ आणि दिल्ली कॅपिटल्स प्रत्येकी 10 अंकासह प्लेऑफच्या रेसमध्ये आहेत. या संघांनी जर उर्वरित 5 सामन्यांपैकी 4 सामने जिंकले अन् राजस्थानने सर्व सामने हरले तरी देखील राजस्थानचा प्लेऑफमधून पत्ता कट होऊ शकतो. राजस्थानचा सध्या नेट रननेट देखील चांगला आहे. त्यांच्याकडे +0.694 नेट रननेट आहे. जर एखाद्या सामन्यात राजस्थान मोठ्या फरकाने हरली तरी देखील त्यांचा नेट रननेट देखील खाली जाईल. याचा फटका त्यांना नक्कीच प्लेऑफमध्ये पोहचण्यास बसू शकतो.
दरम्यान, सध्या संजू सॅमसन, जॉस बटलर, यशस्वी जयस्वाल, रियान पराग असे खमके खेळाडू राजस्थानकडे आहे. तर बोल्ट आपल्या धारदार बॉलिंग फलंदाजांचे नट बोल्ट ढिल्ले करतच आहे. त्यामुळे सध्या राजस्थानचा फॉर्म पाहता, एकंदरीत राजस्थान प्लेऑफ तर खेळणार हे बारकं पोरकं पण सांगू शकेल. पण क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. मागील आयपीएल हंगामात राजस्थानने पहिल्या 5 मॅचेस आरामात जिंकल्या होत्या. त्यानंतर राजस्थानला उर्वरित सामन्यात धक्क्यावर धक्के बसले अन् राजस्थान प्रत्येक सामना गमावत गेला. त्यामुळे त्यांना प्लेऑफ देखील गाठता आलं नव्हतं. अशीच परिस्थिती पुन्हा होऊ नये, अशी प्रार्थना राजस्थानचे चाहते करत आहेत.