Maharashtra Breaking News LIVE: राज्यातील एसटी भाडेवाढीच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक

Republic Day 2025 : 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडींचा वेगवान आढावा. 

Maharashtra Breaking News LIVE: राज्यातील एसटी भाडेवाढीच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक

76th Republic Day 2025 : भारतात 26 जानेवारी रोजी साजरा होणारा 'प्रजासत्ताक दिन' हा आपल्या देशाच्या इतिहासातील एक अतिशय खास दिवस आहे. हा दिवस आपल्या देशाच्या संविधानाच्या अंमलात येण्याचा आणि भारताला स्वतंत्र, लोकशाही प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्याचा दिवस आहे. प्रजासत्ताक दिनी, कर्तव्य मार्गावर परेड आयोजित केली जाते, ध्वज फडकवला जातो आणि वेगवेगळ्या राज्यांचे चित्र प्रदर्शित केले जातात.

26 Jan 2025, 20:23 वाजता

राज्यातील एसटी भाडेवाढीच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक

ठाकरे गटाकडून भाडेवाढीच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन केलं जाणार आहे. उद्या अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर आणि मराठवाड्यात आंदोलन केले जाणार आहे. तर मंगळवारी संपूर्ण राज्यात ठाकरे गट एस.टी. भाडेवाढीच्या विरोधात मैदानात उतरणार आहे.

26 Jan 2025, 19:40 वाजता

चेंबूरमधील स्वस्तिक पार्क येथील इमारतीला आग

चेंबूरमधील स्वस्तिक पार्क येथील एस आर ए इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आग. अग्निशामक दलाचे 3 बंब घटनास्थळी दाखल.

26 Jan 2025, 19:12 वाजता

नॅशनल टेस्टिंग एजन्सी NEET UG च्या परीक्षेच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG च्या परीक्षेच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल केला आहे. NTA ने जाहीर केले आहे की, आता NEET UG परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा नमुना आणि परीक्षेचा कालावधी कोविड महामारीपूर्वी सारखाच असेल.  

26 Jan 2025, 18:07 वाजता

हॉटेल पियुष इन हे अंबेजोगाई येथील होटल कोणाचे आहे? बीड प्रकरणात अंजली दमानिया यांचं ट्विट 

 

  • बीड प्रकरणात अंजली दमानिया यांचं ट्विट 
  • आंबेजोगाईमधील अलिशान हॉटेल पियुष इनचा फोटो ट्विट 
  • हॉटेल सिव्हिल सर्जन डॉ. अशोक थोरात यांचं  असल्याचा दावा 
  • डॉ. अशोक थोरात यांची चौकशी करण्याची मागणी 
  • याच डॉ. अशोक थोरातांनी संतोष देशमुखांचं शवविच्छेदन केलं होतं.
  • दरम्यान अंजली दमानिया यांनी नेमकं काय ट्विट केलंय पाहू या.

 

26 Jan 2025, 17:58 वाजता

आरोपी आंधळेला कोण वाचवंतय? 

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. हत्येला 47 दिवस पूर्ण झाले तरी आंधळे पोलिसांना सापडलेला नाही. बीड पोलिसांनी  त्याला फरार घोषित केल आहे. कृष्णा आंधळेची माहिती देणाऱ्यांना पोलिसांनी बक्षीसही जाहीर करण्यात आलं आहे. मात्र तरीही आंधळेंचा पत्ता अद्याप लागलेला नाहीये. त्यामुळे तपास यंत्रणांच्या कामगिरीवर संशय व्यक्त केला जातोय. 

26 Jan 2025, 17:40 वाजता

गिया बार्रेचे पुण्यात 74 रुग्ण 

पुणे महानगर पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात गिया बार्रे रुग्णांवर  मोफत उपचार केले जाणार आहेत. त्यासाठी रुग्णालयात 50 नॉर्मल बेड तर 15 ICU बेड आरक्षित करण्यात आले आहे. ज्या खासगी रुग्णालयात GBSचे रुग्ण आहेत. त्या ठिकाणी महापालिकेचे मेडिकल ऑफिसर नियुक्त करण्यात येणार आहेत.. रुग्णांची बिल किती घेतात यावर हे ऑफिसर लक्ष ठेवणार आहेत. पुण्यातील सिंहगड रोडवरील नांदेडगाव, किरकटवाडी परिसरात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. त्या ठिकाणी महापालिका शुद्ध पाण्याचा पुरवठा करणारेय. 

26 Jan 2025, 17:38 वाजता

पुण्यातील गिया बारे बाधित रुग्णाचा मृत्यू 

राज्यात गिया बार्रे आजारानं पहिला बळी घेतलाय. पुण्यातील गिया बार्रेच्या रुग्णाचा मृत्यू झाला.  पुण्यातील DSK विश्वमध्ये हा तरुण राहात होता.. मृत तरुण हा मुळचा सोलापूरचा आहे. काही दिवसांपूर्वीच या तरुणाला पुण्यात गिया बार्रेची लागण झाली होती. तब्येत खालावल्यानं त्याला सोलापूरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.. तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला ICUमधून बाहेर काढण्यात आलं होतं.  त्याला पुन्हा श्वशनाचा त्रास झाल्यानं त्याचा मृत्यू झाला.. 

26 Jan 2025, 17:16 वाजता

लाडकी बहीण योजनेचे निकष बदललेले नाहीत- आदिती तटकरे

 राज्यात सुरू असलेली लाडकी बहीण योजना आहे तशीच सुरू राहणार असून सरकारने एकही निकष बदललेला नाही आणि बदलला जाणार ही नाही असे स्पष्टीकरण राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. चालू वर्षात 2 कोटी 41 लाख लाडक्या बहिणींना लाभ मिळाला आहे. ज्या लाडक्या बहिणी स्वतःहून पुढे येऊन आपल्या प्रगतीबाबत सांगून स्वतः आता लाभ नको असे सांगत आहे. त्यांच्याबाबत निर्णय घेणे सुरू आहे या योजनेमुळे सुरूवाती पासूनच विरोधकांना धास्ती वाटत आहे त्यामुळे चुकीचा प्रसार माध्यमातून केला जातोय मात्र ही योजना अशाच पध्दतीने चालू राहील हे देखील त्यांनी स्पष्ट केले. 

26 Jan 2025, 14:25 वाजता

...तर नक्कीच जरांगेंची भेट घेईन; पंकजा मुंडेंचं विधान

मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराती येथे सामूहिक आमरण उपोषण सुरू केलं असून जरांगे पाटलांनी मला भेटण्याबाबत सकारात्मकता दाखवली तर नक्कीच त्यांची भेट घेईन,तसा निरोप देखील त्यांना पाठवणार असल्याचं जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.जरांगे यांच्या लढ्याला यश यावं अशी माझी भावना असल्याचं मुंडे यांनी स्पष्ट केलं.

 

26 Jan 2025, 12:58 वाजता

घरात बसून फक्त ‘क्रेडिट’चं...; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला?

"विधानसभेच्या निवडणूकीत ज्यांना मतदारांनी ‘डिलीट’ केलं त्यांनी आता कोस्टल रोडचं ‘क्रेडिट’ घेण्याचा केविलवाणा प्रयत्न चालवला आहे.  काम करणाऱ्यांचं ‘मेरिट’ जनतेला माहित आहे. त्यामुळे घरात बसून फक्त ‘क्रेडिट’चं राजकारण करणाऱ्यांना मुंबईकर येत्या निवडणूकीत कायमचं ‘डिलीट’ करतील," असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंचा थेट उल्लेख न करता म्हटलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार असतं तर कोस्टल रोडचं काम लवकर झालं असतं असं आदित्य ठाकरेंनी शनिवारी म्हटलं आहे. आज या टिकेला शिंदेंनी उत्तर दिलं आहे.