76th Republic Day 2025 : भारतात 26 जानेवारी रोजी साजरा होणारा 'प्रजासत्ताक दिन' हा आपल्या देशाच्या इतिहासातील एक अतिशय खास दिवस आहे. हा दिवस आपल्या देशाच्या संविधानाच्या अंमलात येण्याचा आणि भारताला स्वतंत्र, लोकशाही प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्याचा दिवस आहे. प्रजासत्ताक दिनी, कर्तव्य मार्गावर परेड आयोजित केली जाते, ध्वज फडकवला जातो आणि वेगवेगळ्या राज्यांचे चित्र प्रदर्शित केले जातात.
26 Jan 2025, 12:15 वाजता
76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची कर्तव्यपथावर सांगता. 31 चित्ररथांचा यामध्ये सहभाग
26 Jan 2025, 10:45 वाजता
2025 मध्ये साजऱ्या होणाऱ्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
76th #RepublicDay | Flower petals being showered during Republic Day Parade, in Delhi
(Source: DD News) pic.twitter.com/B5yDoREJQ3
— ANI (@ANI) January 26, 2025
26 Jan 2025, 10:43 वाजता
2025 च्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची घोषणा 300 कलाकारांच्या गटाकडून स्थानिक वाद्य सादर केले जात आहे.
76th #RepublicDay| The heralding of the Republic Day Parade 2025 is being done by a group of 300 artists with an Indigenous mix of instruments. Ministry of Culture has brought together this ensemble of instruments that includes a wide mix of wind and percussion instruments.… pic.twitter.com/soY31GJ52S
— ANI (@ANI) January 26, 2025
26 Jan 2025, 09:07 वाजता
शरद पवारांचे 30 जानेवारीपर्यंतचे सर्व दौरे रद्द
तब्येतीच्या कारणास्तव शरद पवारांचे 30 जानेवारीपर्यंतचे सर्व दौरे रद्द केले आहेत. पुढील काही दिवस विश्रांती घेण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे.
26 Jan 2025, 07:13 वाजता
76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी कार्तव्य पथावर तयारी सुरू
#WATCH | Delhi | Preparations underway at the Kartavya Path for the 76th Republic Day celebrations#RepublicDay2025 #RepublicDay pic.twitter.com/2Z6jExMgFY
— ANI (@ANI) January 26, 2025
26 Jan 2025, 07:11 वाजता
जरांगेंच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. जालन्यातील अंतरवाली सराटीत त्यांनी पुन्हा उपोषणाला सुरूवात केलीय. मराठा आरक्षणाच्या सहा प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी ते उपोषणाला बसलेत.
26 Jan 2025, 07:08 वाजता
मुंबईकरांसाठी नवा मार्ग होणार खुला
वांद्रे-वरळी सागरी सेतूला जोडणा-या पुलाचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. उद्या म्हणजेच सोमवारपासून हा सागरी किनारा मार्ग पूर्णक्षमतेने मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. या पुलावरून दक्षिण मुंबई ते वांद्रेपर्यंत दुतर्फा वाहतूक सुरू होणार.
26 Jan 2025, 06:58 वाजता
प्रजासत्ताक चिरायु होवो....
देशभरात 76 व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावर संचलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो राहणार उपस्थित आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आोयजन करण्यात आलं आहे.
26 Jan 2025, 06:34 वाजता
76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गणपत पूल आणि पोल दोडा पूल तिरंग्याने सजवले गेले
#WATCH | J&K | Ganpat Bridge and Pul Doda Bridge illuminated in tricolor on the eve of 76th Republic Day#RepublicDay2025 pic.twitter.com/eDEDiFIVPP
— ANI (@ANI) January 25, 2025
26 Jan 2025, 06:27 वाजता
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 26 जानेवारी, 2025 रोजी नवी दिल्लीतील कर्तव्यपथावरून 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी देशाचे नेतृत्व करतील. राज्यघटनेच्या स्वीकृतीची 75 वर्षे आणि जन भागिदारी यावर विशेष लक्ष केंद्रित करत यंदाचा सोहळा भारताची समृद्ध सांस्कृतिक विविधता, एकता, समानता, विकास आणि लष्करी सामर्थ्याचे एक अनोखे मिश्रण असेल. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रीय महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये ‘जन भागीदारी’ वाढवण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाला अनुसरून सुमारे 10,000 विशेष अतिथींना संचलन पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील हे विशेष अतिथी ‘स्वर्णिम भारत’चे शिल्पकार आहेत. त्यामध्ये विविध क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या तसेच सरकारच्या योजनांचा उत्तम वापर करणाऱ्यांचा समावेश आहे.