Choreographer who is Christian and Family is Hindu : अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी धर्म परिवर्तन केलं आहे. अनेकांनी प्रेमासाठी धर्म परिवर्तन केलं. तर एका सेलिब्रिटीनं आई-वडिलांमुळे हे केलं . तर त्याच्या कुटुंबात कोणी असं केलं नाही. फक्त त्यानं एकट्यानंच हा निर्णय घेतला आणि त्यामुळे त्याला तीन वेळा लग्न करावं लागलं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा सेलिब्रिटी कोण आहे. तर त्याच्याविषयी आज आपण जाणून घेऊया.
हा सेलिब्रिटी दुसरा कोणी नसून लोकप्रिय डान्स कोरियोग्राफर आणि डान्स रिअॅलिटी शोचा परिक्षक रेमो डिसूजा आहे. रेमो नुकताच महाकुंभ मेळ्यात पोहोचला. त्यावेळी त्याला कोणी ओळखू नये यासाठी त्यानं त्याचा चेहरा लपवला. इतकंच नाही तर त्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला तेव्हा लोकांना आश्चर्य झालं.
दरम्यान, रेमो हा जन्मानं हिंदू आहे. त्याचं नाव रेमो डिसूजा हे धर्म परिवर्तन केल्यानंतरच आहे. त्याच्या आधी त्याचं नाव रमेश गोपी नायर होतं. धर्म बदल्याविषयी कोमल नहाटाला रेमोला सांगितलं होतं की 'माझे वडील एअरफोर्समध्ये होते. तर ते खूप स्ट्रिक्ट होते. पण आश्चर्य या गोष्टीचं आहे की दोघांनी विचारलं की तुला काय करायचं आहे? मी म्हणालो की धर्म परिवर्तन करायचा आहे. तर त्यांनी सांगितलं की करुन घे. कारण माझ्या वडिलांना येशूवर खूप विश्वास होता. माझ्या आईचा देखील त्यांच्यावर विश्वास होता. तर त्यानं सांगितलं की ठीक आहे. पण त्यानं त्याचा धर्म बदलला नाही. ते हिंदूच राहिले. माझ्या 8 लोकांच्या कुटुंबात फक्त मी ख्रिश्चन आहे. बाकी सगळे हिंदू आहेत.'
रेमोविषयी बोलायचं झालं तर त्याची पत्नी लिजेल डिसूजाला दोन मुलं आहे. भारती सिंग आणि हर्ष लिम्बाचियाच्या पॉडकास्टमध्ये त्यानं सांगितलं होतं की त्यानं दोन वेळा लग्न केलं. तर तिसऱ्या लग्नाचा उल्लेख त्यानं लग्नाच्या 20 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं केला. त्यानं सांगितलं की 'पहिलं लग्न मंदिरात केलं. 21 व्या वर्षी मी आई झाले. त्यावेळी रेमो हा 25 वर्षांचा होता. भारतीच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की त्यांनी लग्न आणि बाळ झाल्याची माहिती सगळ्यांपासून लपवली होती. तो हंसल मेहता आणि अनुभव सिन्हासोबत जवळच्या आणखी दोन लोकांना माहित होती. जे रुग्णालयात भेटायला आले होते. पण लग्नाविषयी कोणालाच माहित नव्हतं. फक्त लिजेलच्या आईला माहित होती. तर ज्यांना लग्नाविषयी माहित नव्हतं ते हेच बोलत होते की लग्न करून घ्या कारण आता बाळ पण झालंय.'
लिजेलनं याविषयी सांगितलं की '40 दिवसात मुलाला बॅपटिज्म करावं लागतं. त्यात त्या बाळाला चर्चमध्ये घेऊन जातात आणि त्यानंतरच त्याचा सदस्यता मिळते. तर रेमोच्या सासून तिला सांगितलं की आता चर्चमध्ये त्यांना लग्न करावं लागेल. मे मध्ये मुलगा झाला आणि नंतर नंतर करत त्यांना ऑक्टोबरमध्ये लग्न केलं. त्यानंतर त्याचं बाळं हे त्यांचं हक्काचं झालं.'