Breaking News Live Update : पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी महत्वाची बैठक सुरू, बांगलादेशमधील अस्थिरतेवर चर्चा

Breaking News Live Update : राज्यात आचारसंहिता नेमकी कधीपासून लागू होणार याविषयीची उत्सुकता असतानाच आता अनेक राजकीय खलबतं सुरू झाली आहेत.   

Breaking News Live Update : पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी महत्वाची बैठक सुरू, बांगलादेशमधील अस्थिरतेवर चर्चा

Breaking News Live Update : विधानसभा निवडणुकांसाठी काही दिवस शिल्लक असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पण, या साऱ्यामध्ये राज्यात मोठ्या मुक्कामासाठी आलेला पाऊस मात्र माघार घेताना दिसत नसल्यामुळं काही भागांमध्ये अडचणीची परिस्थिती उदभवताना दिसत आहे. 

 

5 Aug 2024, 20:46 वाजता

पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी महत्वाची बैठक सुरू

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल बैठकीला उपस्थित

बांगलादेशमधील अस्थिर परिस्थितीवर बैठकीत चर्चा

5 Aug 2024, 19:33 वाजता

बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचं कांस्य पदक हुकलं 

Lakshya Sen vs Lee Zii Jia Bronze Medal Match: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज 10 व्या दिवशी भारताच्या पदरी निराशा पडली आहे. बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचं कांस्य पदक हुकलं आहे. ऑलिंपिकमध्ये उपांत्य फेरी खेळणारा तो पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू ठरला होता.

 

5 Aug 2024, 18:51 वाजता

भारत-बांगलादेश सीमेवरील परिस्थितीवर बारकाईने लक्ष, बीएसएफकडून पत्रक जारी

भारत-बांगलादेश सीमेवरील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत

कोणतीही अनपेक्षित परिस्थिती उद्भवल्यास त्याचा सामना करण्यासाठी बीएसएफ सज्ज आहे.

बीएसएफ डीजी पूर्व कमांडमध्ये उपस्थित आहेत.

भारत-बांगलादेश सीमेवरील परिस्थिती सध्या सामान्य आहे.

भारतीय सीमेवरील सैन्य सतर्क आहे.

सध्याच्या परिस्थितीबद्दल सैन्य जागरूक आहे.

5 Aug 2024, 18:21 वाजता

राज ठाकरे धाराशीवमध्ये मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक घुसले; भेट नाकारल्याने मराठा आंदोलक संतप्त

5 Aug 2024, 18:12 वाजता

गणेश मंडळांना सरसकट पाच वर्षांची मंडप परवानगी द्या, पालिका आयुक्तांना पत्र

कोणत्याही अटी शर्थींशिवाय परवानगी देण्याची मागणी

मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी लिहिले पत्र

मुंबई महापालिका आयुक्तांना मंत्री लोढांचे पत्र

मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या बैठकीनंतर मंत्री लोढांची मागणी

5 Aug 2024, 17:51 वाजता

शेख हसिना भारतात दाखल

शेख हसिना यांचं विमान हिंडन एअरबेसवर उतरलं
भारतीय लष्कर अधिकाऱ्यांनी शेख हसिनांचं केलं स्वागत
थोडा वेळ भारतात थांबून करणार पुढील प्रवासाला सुरुवात

 

5 Aug 2024, 16:42 वाजता

सुप्रीम कोर्टात उद्या शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी 

उद्या सुप्रीम कोर्टात शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पार पडेल आणि त्यानंतर राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी पार पडणार 

सुप्रीम कोर्टात 7 नोव्हेंबरला शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादीची सुनावणी पार पडणार 

सुनावणी एकाच दिवशी होणार 
मात्र दोन्ही याचिकेवर स्वतंत्र सुनावणी पार पडणार 

शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायाधीश जे. बी. पारडीवाला आणि न्यायाधीश मनोज मिश्रा यांच्या खंडपीठांसमोर होणार आहे 

निवडणूक आयोगातील राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह याबाबतची सुनावणी देखील उद्या होण्याची शक्यता

5 Aug 2024, 16:10 वाजता

बांगलादेशातील सध्याची परिस्थिती पाहता बीएसएफने मागील 24 तासांपासून देशातील सीमेवर अलर्ट जारी केला आहे

बीएसएफ डीजी सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत

बीएसएफ डीजी दलजीत चौधरी कोलकाता येथे आहेत

बीएसएफने सीमेवर जवानांची संख्या वाढवली

5 Aug 2024, 15:26 वाजता

बांगलादेशात उलटफेर, शेख हसीना यांचा राजीनामा; लष्कराने सत्ता घेतली ताब्यात

What Is The Issue In Bangladesh Why India Neighbouring Country Burning: भारताचा शेजारी असलेल्या बांगलादेशमधील सत्तात लष्काराने हाती घेतली आहे. चौथ्यांदा पंतप्रधान झालेल्या शेख हसिना यांनी पदाचा राजीनामा देऊन भारताच्या आश्रयाला आल्या आहेत. बांगलादेशमधील पंतप्रधानाच्या निवासस्थानावर हजारोंच्या संख्येनं जमावाने हल्ला केल्यानंतर लष्करी हेलिकॉप्टरने हसिना भारतात दाखल झाल्या आहेत.

5 Aug 2024, 13:20 वाजता

Breaking News Live Update : माळशेज घाटात कारचा अपघात; दोघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

कल्याण नगर महामार्गावर माळशेज घाटातील भोरांडे गावाजवळ असलेल्या वळणावर चालकाचे कार वरील नियंत्रण सुटल्याने कार झाडावर जावुन धडकली,या अपघातात कार मधील समोरच्या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे, त्यामुळे जखमी आणि मृत तरुणांना कार मधुन बाहेर काढण्यासाठी वेळ लागला.घटना स्थळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अपघातस्थळी राष्ट्रीय माहामार्ग पोलिस माळशेज घाट आणि टोकावडे पोलिस निरीक्षक दिनकर चकोर हे उपस्थित होते जखमी आणि मृत तरुणांना क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आले.जखमी आणि मृत तरुणांना मुरबाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारमधील सर्व जण हे कल्याण रेवती आणि गोवेली परिसरातील आहेत.