Breaking News Live Update : पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी महत्वाची बैठक सुरू, बांगलादेशमधील अस्थिरतेवर चर्चा

Breaking News Live Update : राज्यात आचारसंहिता नेमकी कधीपासून लागू होणार याविषयीची उत्सुकता असतानाच आता अनेक राजकीय खलबतं सुरू झाली आहेत.   

Breaking News Live Update : पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी महत्वाची बैठक सुरू, बांगलादेशमधील अस्थिरतेवर चर्चा

Breaking News Live Update : विधानसभा निवडणुकांसाठी काही दिवस शिल्लक असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पण, या साऱ्यामध्ये राज्यात मोठ्या मुक्कामासाठी आलेला पाऊस मात्र माघार घेताना दिसत नसल्यामुळं काही भागांमध्ये अडचणीची परिस्थिती उदभवताना दिसत आहे. 

 

5 Aug 2024, 12:41 वाजता

Breaking News Live Update : गरिबांना जमिनीचा हक्क आम्ही देणार- देवेंद्र फडणवीस 

महाराष्ट्रात मुख्यमंत्री असताना निर्णय घेऊन झोपडपट्टीमध्ये जे लोक वर्षानुवर्ष राहत आहे, त्यांना राहत्या जमिनीवरच मालकी हक्काचा पट्टा देण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा नागपूरत मोठी कारवाई केली होती. नंतर काही अडथळे आले.. ते दूर करण्याचा प्रयत्न आपण केला.. खाजगी जमिनीवरील झोपडपट्टीचा प्रश्न होता. नव्याने 2022 ला सरकार आल्यानंतर तो आम्ही सोडवला आहे. टीडीआर देऊन त्या जमिनी अधिकृत करण्याचा आणि तिथल्या झोपडपट्टीवासियांना मालकी हक्क देण्याचा निर्णय आम्ही केला आणि त्यानुसारच आज काही जणांना मालकी हक्काचे अधिकार दिले आहे. पुढेही हजारो गरिबांना जमिनीचा हक्क आम्ही देणार आहोत.

5 Aug 2024, 12:02 वाजता

Breaking News Live Update : विधानसभेसाठी मनसेकडून दोन उमेदवारांची नावं जाहीर; कोण आहेत ते? 

मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा - नवनिर्माण यात्रा सुरु असून आज सोमवार सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे राज ठाकरे यांनी मनसेच्या खालीलप्रमाणे दोन विधानसभा उमेदवारांची घोषणा केली आहे. हे उमेदवार आहेत... 

शिवडी विधानसभा- बाळा नांदगांवकर
⁠पंढरपूर विधानसभा - दिलीप धोत्रे

5 Aug 2024, 11:29 वाजता

Breaking News Live Update : मुख्यमंत्री पुणे दौऱ्यावर 

पुण्यातील पूरसदृश्य परिस्थिती नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर. पुण्यातील एकता नगरची करणार पाहणी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत करणार बैठका. मदत , स्वच्छता, पुनर्वसन, नियोजन यावर घेणार बैठका. या सोबतच मृतांच्या नातेवाईकांचीही घेणार भेट , देणार धीर. आज मुख्यमंत्री ११ वाजता कलिना गेट नंबर ८ इथून पुण्यासाठी रवाना होणार. संध्याकाळपर्यंत वर्षा बंगल्यावर दाखल होणार. अजित पवार यांच्या दौऱ्यानंतर आता मुख्यमंत्री सुद्धा दौऱ्यावर जात असल्याने पुण्यातला आजचा दिवस महत्त्वाचा. 

5 Aug 2024, 11:04 वाजता

Breaking News Live Update : भाजपनं मोर्चा वळवला... 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच मिशन मराठवाडा. सोमवारी रात्री 8 वाजता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील भाजप आमदारांची होणार बैठक पार पडणार आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपला, मराठवाड्यात आलेल्या अपयशानंतर भाजपच मराठवाड्याकडे विशेष लक्ष देणार आहे. कोणकोणत्या कारणांमुळे लोकसभेला मराठवाड्यात भाजपाला अर्थात महायुतीला फटका बसला या संदर्भात विचार मंथन होणार आहे. 

5 Aug 2024, 10:33 वाजता

Breaking News Live Update : शिंदे-पवार बैठकीत 'अदानी'चे  अधिकारी?

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या फारच योगायोग घडत असून, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गेल्या आठवड्यामध्ये भेट घेतली होती. दहा दिवसांच्या आतच झालेली ही दुसरी भेट. विशेष म्हणजे, या वेळी उद्योगपती अदानी यांच्या धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे तीन ज्येष्ठ अधिकारीही वर्षा बंगल्यावर उपस्थित होते असं म्हटलं जात आहे. 

 

5 Aug 2024, 09:53 वाजता

Breaking News Live Update : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईत वाहतूक कोंडी 

मुंबईतील सायन इथं असणाऱ्या रेल्वेमार्गावरील पूल  बंद करण्यात आल्यामुळं या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. इथं आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात वाहनाच्या रांगा पाहायला मिळत आहेत. 1 ऑगस्टपासून सायन ब्रीज बंद करण्यात आला. मुंबईतला सायन स्टेशन समोरचा 112 वर्ष जून पुल पाडून नवीन पूल करण्यात येणार आहे. त्यामुळे येथून वाहतूक बंद करण्यात आली आहे. 

5 Aug 2024, 09:48 वाजता

Breaking News Live Update : स्फोटातील रिसिव्हर उडून ४०० मीटर अंतरावरील चाळीवर पडला

बदलापूरच्या माणकिवली एमआयडीसीत रासायनिक कंपनीत स्फोट झाला असून यात संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. हा स्फोट इतका भीषण होता, की रिऍक्टरचा रिसिव्हर उडून तब्बल ४०० मीटर लांब खरवई परिसरातील एका चाळीवर जाऊन पडला. या दुर्घटनेत  कुटुंबातील लहान मुलीसह तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने कंपनीतील  कामगार बाहेर पळून गेल्याने ते बचावले ,बदलापूरच्या माणकिवली एमआयडीसीत रेअर फार्मा नावाची कंपनी असून त्यात केमिकल्स उत्पादन केलं जातं.

5 Aug 2024, 09:34 वाजता

Breaking News Live Update : कल्याणमध्ये रेल्वे तिकीट काउंटरवर प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये राडा

कल्याणमध्ये रेल्वे तिकीट काउंटरवर प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये राडा झाला. इथे एक प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये तिकीट काढताना सुट्टे पैसे नसल्याच्या वादात प्रवाशांनी गोंधळ घातला. यावेळी महिला प्रवाशांनी या सगळ्याचा व्हिडिओ काढल्याने रेल्वेच्या महिला कर्मचाऱ्यांनी या महिला प्रवाशाला धक्काबुक्की करत मारहाण केल्याचा आरोप आहे. हे बघताच इतर प्रवाशांनी गोंधळ घालत या स्टाफच्या हातातून त्या महिला प्रवाशाची सुटका केली .अर्धा तास हा गोंधळ सुरू असताना रेल्वे पोलिसांनी मध्यस्थी करून प्रवासी आणि तिकीट काउंटर वरील स्टाफ यांच्यातील वाद मिटवला.

5 Aug 2024, 09:30 वाजता

Breaking News Live Update : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोलापुरात, म्हणाले... 

225 ते 250 जागा मी लढवणार असं आधीच सांगितलं होतं. तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण केलं जात आहे. आरक्षणाचं राजकारण आपण समजून घेतलं पाहिजे. नोकरी, शिक्षणासाठी जातीचा प्रश्न येतोच कुठे? आरक्षणाचा मुद्दा म्हणजे मतांचं राजकारण... म्हणत राज ठाकरे सोलापुरात कडाडले. 

5 Aug 2024, 09:19 वाजता

Breaking News Live Update : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा उबाठा गठात मोठे फेरबदल 

पालघर मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वूमीवर मोठा उबाठा गठात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दोन्ही पालघर जिल्हा प्रमुखांची उचलबांगडी कण्यात आली असून त्याठिकाणी अजय ठाकूर आणि अनुप पाटील या नवीन जिल्हा प्रमुख नेमणूक करण्यात आली आहे.तर निलेश गंधे आणि गिरीश राऊत यांची सह संपर्क प्रमुख पदी वर्णी लागली आहे. तर ओमकार पाटील यांची जिल्हा समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.शिवसेना नेते विनायक राऊत यांनी सदर नियुक्त्या केल्या असल्याचं पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.