लहान मुलाने टाकलं, स्वत:च्या डोळ्यात फेविक्विक

उजव्या डोळ्यात फेविक्विक टाकल्यानं या चिमुरड्याचा डोळा चिकटल्याची घटना जळगावात घडली.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 16, 2017, 09:58 PM IST
लहान मुलाने टाकलं, स्वत:च्या डोळ्यात फेविक्विक  title=

जळगाव : कुटुंबीय लग्न समारंभात असताना ७ वर्षीय मुलाने, उजव्या डोळ्यात फेविक्विक टाकल्यानं या चिमुरड्याचा डोळा चिकटल्याची घटना जळगावात घडली. 

डोळा बालंबाल बचावला

सुदैवाने हे फेविक्विक मात्र त्याच्या पापण्यावर पडल्याने त्याचा डोळा बालंबाल बचावला. वेदांत सूरज पंडित असं या जखमी मुलाचं नाव असून तो काकाच्या विवाहाला कुटुंबियांसोबत आला होता. 

आयड्रॉप म्हणून डोळ्यात टाकले

यावेळी खेळताना वेदांतला फेविक्विकचे पाऊच सापडले. त्याने ते आयड्रॉप म्हणून उजव्या डोळ्यात टाकले. सुदैवाने त्याचे थेंब डोळ्याच्या आत गेले नाही. त्यामुळे त्याच्या पापण्या एकमेकांना चिकटल्या. 

संभाव्य संकटातून सुटका

कुटुंबीयांनी त्याला तातडीन डॉक्टरांकडे नेलं, यावेळी डॉक्टरांनी पापणीचे केस कैचीने कापूण काही वेळानं, मात्र या मुलाची संभाव्य संकटातून सुटका झाली.