१४ मे पासून मद्याच्या होम डिलिव्हरीला परवानगी, पण...

ही परवानगी केवळ कोरोना संपेपर्यंतच असेल

Updated: May 12, 2020, 05:15 PM IST
१४ मे पासून मद्याच्या होम डिलिव्हरीला परवानगी, पण... title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: राज्यातील दारुविक्री सुरु असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये आणि शहरांमध्ये १४ मेपासून मद्याच्या होम डिलिव्हरीला परवानगी देण्यात येणार आहे. मात्र, मुंबईसह दारुविक्री बंद असलेल्या ठिकाणी मद्याची होम डिलिव्हरी मिळणार नाही. उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या जिल्ह्यात दारुविक्री सुरु आहे तिथे रांगेत उभे राहण्यासोबत मद्य घरपोचही केले जाईल. 

मद्याची होम डिलिव्हरी कशी द्यायची याचे नियोजन वाईन शॉप्सनी करायचे आहे. ही परवानगी केवळ कोरोना संपेपर्यंतच असेल. तसेच दारु घरपोच करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैदयकीय चाचणी करून त्यांची यादी उत्पादन शुल्क विभागाला द्यावी लागणार आहे. तसेच या कर्मचाऱ्यांनी हातमोजे, मास्क आणि गॉगल वापरणे बंधनकारक असेल. 

Lockdown 3.0 : 'या' राज्यात दारु विक्रीचा रेकॉर्ड; एका दिवसांत ४५ कोटींची कमाई

यापूर्वी राज्य सरकारने रेड झोनमधील दारुची दुकानेही उघडण्यास परवानगी दिली होती. मात्र, मुंबई आमि पुण्यासारख्या शहरांमध्ये दारु खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली होती. यावेळी तळीरामांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवले होते. त्यामुळे सरकारने रेड झोनमध्ये अवघ्या काही तासांत पुन्हा कडक निर्बंध लादले होते. 

महाराष्ट्रात सुरु केलेली दारुविक्री ही घातक - चंद्रकांत पाटील

दरम्यानच्या तीन दिवसांच्या काळात राज्य सरकारने दारु विक्रीतून १०० कोटी रुपयांचा महसूल गोळा केला होता. पहिल्या तीन दिवसांत २९ लाख लिटर दारुची विक्री झाली होती. मुंबईतील मद्याची दुकाने बंद असली तरी राज्याच्या इतर भागांमध्ये दारु विक्री मोठ्याप्रमाणावर सुरु आहे.