घराच्या छतावर पडली वीज, घटनेचा VIDEO कॅमेरात कैद

बालाजी नगर परिसरात एका घराच्या छतावर वीज कोसळली.

Updated: Oct 6, 2021, 09:45 PM IST
घराच्या छतावर पडली वीज, घटनेचा VIDEO कॅमेरात कैद title=

दौड: सध्या दौंड परिसरात गेल्या दोन-तीन दिवसापासून वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. आज सायंकाळी दौंड शहरातील बालाजी नगर परिसरात एका घराच्या छतावर वीज कोसळली. ही वीज कोसळताना चे दृश्य कॅमेर्‍यात कैद झाले आहे.

वीस कोसळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घराच्या छतावर वीज कोसळल्याने घराच्या छताची नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. वीज पडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

राज्यात अनेक ठिकाणी सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.