'लंगडी' वाघिणीचं सावज टप्प्यात येवूनही चुकलं... पाहा व्हीडिओ

तब्बल तीन वेळा लंगडी वाघिणीचं सावज हुकलं 

Updated: Jun 29, 2021, 09:35 AM IST
'लंगडी' वाघिणीचं सावज टप्प्यात येवूनही  चुकलं... पाहा व्हीडिओ title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पात एक वाघिणी सांबरची शिकार करण्यासाठीचा झेप घेतानाचा थरारक व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. मध्य प्रदेश पेंच व्याघ्र प्रकल्पातील 'लंगडी' नावाच्या वाघिणीचा हा व्हीडिओ आहे. लंगडी वाघिणीने सांबरच्या एका कळपावर झेप घेतली. या वाघिणीनं शिकार करण्यासाठी 15  ते 20 सांबराचा कळपा शिकार करण्यासाठी धावून गेली. मात्र 15 ते 20 सांबरपैकी एकही शिकार तिच्या हाती लागली नाही....लंगडी वाघिणीचा सांबर शिकार कjण्यासाठीचा प्रयत्नाचा 22 सेकंदाचा व्हीडिओ झी 24 तासवर आपण EXCLUSIVE  पाहु शकतो.

पुण्यातील वन्यजीव प्रेमी आणि पर्यटक रोहित दामले यांनी सफारी दरम्यान लंगडी वाघिणीचा शिकार करण्याच्या प्रयत्नाचा दृश्य पाहिलं असून चित्रितही केलं आहे. लंगडी वाघिणीचा तीन वर्षांपूर्वी हरणाची झेप घेवून केलेल्या शिकारचा व्हीडिओ खूप व्हायरल झाला होता. मे 2018 मधील त्या व्हीडिओमध्ये तेव्हा सावज टप्प्यात येताच अगदी अचूकतेनं झेप घेत लंगडीनं हरणाची शिकार केली होती.

सफारी दरम्यान पर्यटकांनी हा थरार पाहिला होता. त्यामुळं 25 जुनला तुरिया गेटवरून सफारीवर गेलेल्या पर्यटकांना पुन्हा त्याची पुनरावृत्ती  दिसेल असं वाटत होतं. पेंच तुरिया गेटजवळील तलावात एका सांबरचा  कळप एका टोकावर होता. दुस-या टोकावर लंगडी वाघिण बसली होती. लंगडी वाघिण 15 मिनिटांनंतर तिथून निघून गेली आणि गायब झाली. आणि त्यानंतर अचानक सांबराच शिकार करण्यासाठी झेप घेताना ती दिसली.

सुमारे 15 ते 20 सांबर तिथे होते. यावेळी वाघिणीचा हल्ला चुकवण्यासाठी सांबरही जिव वाचवण्यासाठी पळू लागले. पहिल्या टप्प्यात एका सांबरचा शिकार करण्याचा वाघिणीचा प्रयत्न फसला .हा थरार 15 सुमारे सेकंदाचा आहे. पहिला सावजान हुलकावणी दिल्यानंतर लगेच तिनं दुस-या सांबरवर धाव घेतली.

मात्र दुसरा सांबरही तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरला. लंगडीचा शिकार हुकली तरी हा संपूर्ण थरार सफारीवर असलेल्या पर्यंटकांच्या कॅमेरात चित्रीत झाला. जंगलात वन्यप्राण्याचा जगण्यासाठी किती सतर्क रहावं लागत. त्यांचा जगण्याच्या  रोजचा संघर्ष असतो या काटा आणणारा थरारक यावेळी पर्यटकांनी पाहिला. 

पेंचमधील लंगडीचा  शिकारीसाठी घेतलेली झेप मात्र टप्प्यात येवूनही सावज चुकल्याचा हा संपूर्ण थऱार पाहून पर्यटकही थक्क झाले. लंगडी वाघिण ही पेंचच्या बडी मादा वाघिणीची मुलगी आहे. आणि कॉलरवाली वाघिणीची बहिण आहे.