पारनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र कोरठण खंडोबाची यात्रा

  जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र कोरठण खंडोबाची यात्रा प्रसिद्ध आहे.

Updated: Jan 5, 2018, 08:08 PM IST
पारनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र कोरठण खंडोबाची यात्रा title=

अहमदनगर :  जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र कोरठण खंडोबाची यात्रा प्रसिद्ध आहे.

100 फुटाहून अधिक उंच मानाच्या काठ्यांची मिरवणूक हे यात्रेचं वैशिष्ट्य आहे. हा उत्सव पाहण्यासाठी राज्यातून 5 ते 6 लाख भाविक कोरठण खंडोबामध्ये जमले होते. 

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठामधील श्रीक्षेत्र खंडोबा... स्वयंभू तांदळासमोर 12 लिंग अशा या देवाचं दर्शन घेण्यासाठी राज्यातून तसंच राज्याबाहेरून भाविक येतात. तीन दिवस चालणा-या यात्रेची नुकतीच सांगता झाली. यात्रेत पालखीचं दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक आले होते. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे बेल्हा,  ब्राम्हणवाडामधून येणा-या मानाच्या उंचच उंच काठ्या.... विशेष म्हणजे या काठ्या 100 ते 150 फुट उंच असून लाखो भाविक मानानं या काठ्या मंदिराच्या कळसाला टेकवतात. पालखी सोहळा पार पडल्यानंतर मानाच्या काठ्यांचं दृश्य पाहण्यासाठी जिल्ह्यासह मुंबई, नाशिक, ठाणे,  पुणे देखील खंडोबाच्या भक्तांनी मोठी गर्दी केली.

  या यात्रेत प्रसाद म्हणून सदा आनंदाचा येळकोट असे म्हणून खोबरं उधळलं जातं. त्यामुळे यात्रेत खोबरे आणि भंडा-याची मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते. या तिर्थक्षेत्राचा पर्यटन विकासाच्या ब वर्गात समावेश झालाय. मात्र ईथे येणा-या भाविकांची गर्दी पाहता शासनानं या तिर्थक्षेत्राचे अ वर्गात समावेश करावा अशी मागणी देवस्थाननं केलीय.