कोपर्डी बलात्कार : 'फाशी नको, जन्मठेपेची शिक्षा द्या'

कोपर्डीच्या अल्पवयीन मुलीचा बलात्कार आणि हत्या प्रकरणी आज शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. 

Updated: Nov 22, 2017, 09:04 AM IST
कोपर्डी बलात्कार : 'फाशी नको, जन्मठेपेची शिक्षा द्या' title=

अहमदनगर : कोपर्डीच्या अल्पवयीन मुलीचा बलात्कार आणि हत्या प्रकरणी आज शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. 

जितेंद्र शिंदे आणि नितीन भैलुने या दोन दोषींच्या शिक्षेबाबतचा युक्तीवाद मंगळवारी संपला. तर संतोष भवाळच्या शिक्षेबाबत आज युक्तीवाद करण्यात येणार आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमही आजच सरकारी पक्षाची बाजू मांडणार आहेत.

जितेंद्र शिंदे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्यामुळे त्याला फाशी नको, जन्मठेपेची शिक्षा द्या अशी मागणी त्याच्या वकिलांनी केलीय. 

तर नितीन भैलुमे हा २६ वर्षीय तरुण असून तो शिक्षण घेतोय. त्याचं कुटुंब त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळं त्याला कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी मागणी त्याच्या वकिलांनी केलीय. 

आरोपींवर सिद्ध झालेल्या गुन्ह्यांमध्ये दोषींना जन्मठेप किंवा फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे आजचा युक्तीवाद संपल्यानंतर अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय काय शिक्षा सुनावणार याकडं लक्ष लागलंय.