Konkan Railway News Update: कोकण रेल्वे मार्गावरील सध्याची अतिरिक्त गर्दी पाहता रेल्वेकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळो कोकणवासियांचा प्रवास सोयीस्कर होण्याची शक्यता आहे. याचपार्श्वभूमीवर पनवेल ते चिपळून (Panvel To Chiplun Emu Railway) आणि रत्नागिरीदरम्यामन अनारक्षित विशेष मेमू गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 31 मार्चपर्यंत प्रत्येक रविवारी दोन्ही बाजूने दोन मेमू गाड्या धावणार आहेत. या विशेष मेमू मुळे या मार्गावरीस प्रवाशांची मोठी गैरसोट टळेल अशा विश्वास कोकण रेल्वेकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पनवेल-रत्नागिरी (01157) विशेष अनारक्षित मेमू ट्रेन 4 फेब्रुवारी ते 31 मार्च दरम्यान दर रविवारी रात्री 8:25 वाजता पनवेल स्टेशनहून सुटेल. त्यानंतर ती दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता रत्नागिरी स्थानकावर पोहचेल. तर चिपळूण-पनवेल (01158) विशेष अनारक्षित मेमू ट्रेन 4 फेब्रुवारी ते 31 मार्च दरम्यान चिपळूण स्टेशनहून सुटेलय. याचदरम्यान रविवारी दुपारी 15.25 वाजता चिपळून स्थानकातून सुटेल. ती त्याच दिवशी रात्री 8. 15 वाजता पनवेल स्थानकात पोहचेल. ती त्याच दिवशी रात्री सुटेल येथे प्रत्येक रविवारी 15:25 वाजता धावेल. त्याच दिवशी रात्री 8.15 वाजता ती पनवेल स्थानकात पोहोचली.
या गाड्यांना आठ डबे असतील आणि ते पूर्णपणे अनारक्षित असेल. कोकण रेल्वेने प्रत्येक आठवड्याच्या दिवशी चिपळूण ते पनवेल आणि पनवेल ते रत्नागिरी अशा अनारक्षित मेमू विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. दोन्ही गाड्यांच्या प्रत्येकी 9 प्रवासी असलेल्या एकूण 18 ट्रिप चालवल्या जातील. त्यामुळे मुंबईहून चिपळूणला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या विशेश मेमूला अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखावटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, निडी, नागोठणे, कासू, पेण, हमरापूर, जिते, आपटा, रसायनी येथून केवळ मेमू विशेष या स्थानकांवर थांबणार असल्याचे कोकण रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.