कोल्हापुरातल्या शिवप्रेमींवर काळाचा घाला; शिवज्योत आणताना दोघांचा मृत्यू तर एक जण जखमी

kolhapur News : राज्यभरात शिवजयंती उत्साहात साजरी होत असताना कोल्हापुरातल्या या घटनेने शिवभक्तांवर शोकळला पसरली आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे

Updated: Feb 19, 2023, 01:25 PM IST
कोल्हापुरातल्या शिवप्रेमींवर काळाचा घाला; शिवज्योत आणताना दोघांचा मृत्यू तर एक जण जखमी title=

kolhapur News : राज्यासह देशभरात उत्साहात साजऱ्या होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज  (chhatrapati shivaji maharaj)  यांच्या जयंतीच्या उत्साहाला कोल्हापुरात गालबोट लागलं आहे. कोल्हापुरातल्या या हृदयद्रावक घटनेमुळे शोककळा पसरली आहे. शिवजयंतीच्या (Shiv Jayanti 2023) निमित्ताने पन्हाळा गडावरून शिवज्योत आणताना भीषण अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  

संतोष बाळासाहेब पाटील (32) आणि अक्षय सुरेश पाडळकर (24) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. दोघेही कोल्हापुरातील कदमवाडी आणि भोसलेवाडी परिसरात राहत होते. वाहनाच्या धडकेत या दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या तरुणांच्या मृत्यून गावावर शोककळा पसरली आहे.

शिवज्योत आणण्यासाठी कदमवाडी भोसलेवाडी येथून संतोष पाटील आणि अक्षय पाडळकर हे पन्हाळा येथे गेले होते. मात्र रजपुतवाडी येथे अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने ते दोघे मृत्यूमुखी पडले. तर निलेश संकपाळ नावाचा तरुण जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी जखमी झालेल्या निलेश संकपाळला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला आणि रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, पोलिसांनी संतोष पाटील आणि अक्षय पाडळकर यांचे मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात शिवजन्मोत्सव साजरा

छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यातील एकमेव मंदिर असलेल्या सिंधुदूर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिरात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. भाजपा कार्यकर्त्यांनी माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत मालवण शहरातून भव्य बाईक रॅली काढत शिवजयंती उत्सवाची सुरवात करण्यात आली. निलेश राणेंनी छत्रपतींचे दर्शन घेतल्यानंतर निलेश राणे हे येत्या निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून येउदे असे साकडे छत्रपतींच्या चरणी घालण्यात आले.