एशियन पेंट्सची 'ती' जाहिरात तात्काळ मागे घ्या, ऋतुराज पाटीलांची मागणी

नेमकं  काय आहे जाहिरातीत? 

Updated: Aug 25, 2020, 08:20 PM IST
एशियन पेंट्सची 'ती' जाहिरात तात्काळ मागे घ्या, ऋतुराज पाटीलांची मागणी  title=

मुंबई : एशियन पेंटच्या जाहिरातीवर आमदार ऋतुराज पाटील यांनी नाराजी व्यक्त करून 'ती' जाहिरात हटवण्याची मागणी केली आहे. तसेच ऋतुराज पाटील यांनी मागणी जाहिरात मागे घेऊन संपूर्ण कोल्हापूरकरांची माफी मागण्याची मागणी केली आहे. जाहिरातीमध्ये कोल्हापूरला हिनवल्याचा प्रकार घडला असल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांचे म्हणणे आहे. 

नेमकं जाहिरातीत काय आहे? 

एशियन पेंटची ही जाहिरात १९ ऑगस्ट रोजी यू ट्यूबवर अपलोड करण्यात आली. आतापर्यंत ही जाहिरात १२ लाखाहून अधिक लोकांनी पाहिली आहे. या जाहिरातीमध्ये एक लहान मुलगा आपल्या मित्रांना घरात केलेलं रंगकाम दाखवत असतो. यानंतर आपण सिंगापूरला फिरायला जाणार असल्याचं सांगतो. यावेळी तो मित्रांमध्ये भाव खात असतो. मात्र तेव्हाच त्याचे वडिल कामावरून येतात आणि त्याला आपल्याला कोल्हापूरला जायची तिकिट मिळाल्याचं सांगतात. यामुळे त्याचे वडिल त्याला चिडवायला लागतात.

या जाहिरातीमध्ये कोल्हापूरला हिनवल्याचं आहे. संपूर्ण जगभरातून पर्यटक अंबाबाईच्या दर्शनाला येत असतात मात्र जाहिरातमध्ये कोल्हापूरला हिनवले, असं ऋतुराज पाटील यांनी म्हटलं आहे. छत्रपती शाहू महाराज यांनी घडवलेल्या कोल्हापूरला हिनावण्याचा प्रकार कधीही सहन करणार नाही, त्यामुळे ऋतुराज पाटील यांनी तातडीने ही जाहिरात हटवण्याची मागणी केली आहे.