पदवीधर निवडणुकीसाठी चौरंगी लढत

पदवीधर निवडणुकिसाठी एकूण 13 उमेदवार रिंगणात 

मुंबई : पदवीधर निवडणुकिसाठी एकूण 13 उमेदवार रिंगणात आहेत.  २५ जूनला ही निवडणूक होत असून अर्ज मागे घेण्याची उद्या अखेरची मुदत आहे.  या निवडणुकीसाठी जवळपास 65 हजार इतकी  मतदार नोंदणी झाली आहे.  मुंबई पदवीधर निवडणुकीसाठी चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेकडून उत्तर मुंबईचे विभागप्रमुख विलास पोटनिस मैदानात आहेत. तर भाजपकडून मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आणि पक्षाच्या ग्राहक हक्क संरक्षण सेलचे  प्रमुख अॅड. अमित मेहता निवडणुकीच्या रिंगणात आहेत. धारावी बचाव समितीचे प्रमुख अॅड. राजेंद्र कोरडे हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप यांच्या पुरोगामी पदवीधर आघाडीचे पुरस्कृत उमेदवार आहेत.  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही पहिल्यांदाच ही निवडणूक लढवत असून मुंबई ग्रॅज्युएट महासंघाचे अध्यक्ष राजू बंडगर यांना पक्षाने पाठिंबा दिला आहे.