चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा किर्ला ग्रामपंचायतीचा निर्णय

भारत आणि चीन या दोन देशांमधील संबंध तणाव पूर्ण झालेत. त्यामुळे चीन हा भारतासाठी चिंतेचा विषय बनलाय. 

Updated: Aug 18, 2017, 07:31 PM IST
चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा किर्ला ग्रामपंचायतीचा निर्णय title=

जालना : भारत आणि चीन या दोन देशांमधील संबंध तणाव पूर्ण झालेत. त्यामुळे चीन हा भारतासाठी चिंतेचा विषय बनलाय. 

अशा परीस्थितीत चिनी बनावटीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जालन्यातील मंठा तालुक्यातील किर्ला ग्रामपंचायतीने घेतलाय. 

हा निर्णय घेऊनच गावकरी थांबले नाहीत तर गावच्या सरपंचांनी 15 ऑगस्टला झालेल्या ग्रामसभेत चिनी वस्तूंची खरेदी टाळण्यासाठी ठराव मांडला. आणि या ठरावाला सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह गावक-यांनीही सहमती दर्शवलीय.