नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने सनदी अधिका-यासोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला आहे. ही संपूर्ण घटना कॅमे-यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट अर्थातच जेएनपीटीचे अधिकारी आणि सिडको प्रकल्पग्रस्त समिती यांच्यात नुकतीच संयुक्त बैठक झाली.
यावेळी काही स्थानिक प्रश्नांवर प्रशांत पाटील अधिका-यांसोबत चर्चा करत होते. या चर्चेवेळी पाटील यांचा स्वत:वरील ताबा सुटला. त्यानंतर प्रशांत पाटील यांनी सनदी अधिका-यांशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. रायगडच्या उरण येथील जेएनपीटीच्या प्रशासकीय विभागात घडलेली ही घटना कॅमे-यात कैद झाली आहे.
#WATCH NCP leader Prashant Patil abused and assaulted an official of Jawaharlal Nehru Port in Raigarh, Maharashtra (Strong language) pic.twitter.com/GHq9DXGm9n
— ANI (@ANI) August 17, 2017
प्रशांत पाटील सनदी अधिका-याला शिवीगाळ करताना दिसत आहेत. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियातही व्हायरल झाला आहे.