Kalyan Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: कल्याणमधून श्रीकांत शिंदेंनी घेतली आघाडी

Kalyan Lok Sabha Election Results 2024 Live: कल्याण मतदारसंघात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) मैदानात असल्याने प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांच्यासमोर ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांचं आव्हान आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 4, 2024, 08:26 AM IST
Kalyan Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: कल्याणमधून श्रीकांत शिंदेंनी घेतली आघाडी title=

Kalyan Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कल्याण मतदारसंघात ( (Kalyan Lok Sabha Constituency) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर (Vaishali Darekare) यांच्यात थेट लढत आहे. यावेळी श्रीकांत शिंदे विजयाची हॅटट्रीक करणार? की वैशाली दरेकर जायंटकिलर ठरणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. थोड्याच वेळात हा निकाल स्पष्ट होईल.
 
2019 मध्ये कल्याण लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदे सलग दुसऱ्यांदा विजयी झाले होते. श्रीकांत शिंदे यांना 5,59,723 मते मिळाली होती. तर राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांना 2,15,380 मते मिळाली होती. त्याशिवाय, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय हेडाऊ यांनी 65,572 मते मिळवली होती. वैशाली दरेकर यांनी 2009 मध्ये मनसेच्या तिकीटावर कल्याण लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी वैशाली दरेकर यांना 1 लाख 02 हजार 63 मते मिळाली होती. 

सविस्तर माहिती थोड्याच वेळात