Pune Lok Sabha Result 2024 : मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर की वसंत मोरे? पुण्याच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार?

पुणे लोकसभा निवडणूक निकाल 2024​ News in Marathi: पुण्याच्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले. मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे यांच्यात तिरंगी लढत झाली. 

वनिता कांबळे | Updated: Jun 4, 2024, 04:44 PM IST
 Pune Lok Sabha Result 2024 :  मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर की वसंत मोरे? पुण्याच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार?  title=

Pune Lok Sabha Election Results 2024 News in Marathi: पुण्याची जागा सर्वात लक्षवेधी ठरली आहे. पुण्यात तिरंगी लढत झाली आहे. पुण्याच्या जागेवरुन महायुती आणि महाविकासआघाडीमध्ये नाराजीनाट्य रंगले होते. भाजपमध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या उमेदवारीमुळे जगदीश मुळीक नाराज झाले होते.  काँग्रेसने रवींद्र धंगेकरांच्या उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल नाराज झाले होते. तर, वसंत मोरे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले. मनसेची साथ सोडून वसंत मोरे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीमध्ये प्रवेश केला. वंचितच्या तिकीटावरच वसंत मोरे यांनी निवडणुक लढवलीमुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर की वसंत मोरे? पुण्यात कोण बाजी मारणार?  याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.