अमर काणे, झी मीडिया, नागपूर: तुमची मुलं चॉकलेट् (Chocolates) खातात. चिप्स (Chips) खाण्यासाठी सतत हट्ट करतात?, मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. लहान मुलांना जंक फूडनं भुरळ घातली आहे. तोंडाला चविष्ट वाटत असली तरी हे खाण्याचे पदार्थ दातांसाठी त्रासदायक ठरतं असल्याचं वास्तव समोर आलं आहे. नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयात दातांमध्ये कीड लागून होत असलेल्या त्रासांमुळे पालक लहान मुलांना उपचारासाठी आणत (Childrens Health and Junk Food) आहेत. काय आहे जंक फूडच्या चविष्ट चवी मागचं धोकादायक वास्तव असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारा करता येणाऱ्या लहानग्यांना कशामुळे दातांचा (Teeth Problems in Children) त्रास होतो याचा तपास घेण्यात आला. (junk food and chocolate causes bad impact on childrens health a report says)
नागपुरच्या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातून 10 महिन्यात लहान मुलांच्या दाताला कीड लागल्याचे 10 हजार पेक्षा जास्त प्रकरण समोर आले आहेत. ज्यामध्ये लहान मुलांना कीड (Cavity) लागून दात दुखण्याचा त्रास होत आहे. खासकरून कीड लागण्याचा आजार हा लहान मुलांना आवडणाऱ्या गोड पदार्थ, चॉकलेट, चिप्स, जंक फूडचा (Junk FOOD Side Effects) चवीतून होत आहेत. त्याच चवीचे हे धोकादायक परिणाम दिसून येता आहे. कोविडच्या काळात ही दातांवर उपचार (Covid) घेणाऱ्यां बालकांची संख्या कमालीची घटून 2020 मध्ये 4 हजार 176 तर 2021 मध्ये 5 हजार 788 बालक हें उपचारासाठी दाखल झाले होते.
हेही वाचा - पुण्याच्या तरूणीने स्वत:च्याच अपहरणाचा रचला डाव, कारण एकूण धक्काच बसेल
काय म्हणतो रिपोर्ट?
पण यंदाच्या वर्षात 10 महिन्यातच ही संख्या 10 हजारापेक्षा अधिक झालेली आहे. वर्ष संपेपर्यंत 14 हजारांपर्यंत जाईल अशी शंका व्यक्त होत आहे. लहान मुल गोड पदार्थांची मागणी करतात. पालक ही त्यांचा हट्टाला पूर्ण करत चॉकलेट गोड पदार्थ घेऊन देतात पण लहान मुलांनी दिवसातून दोन वेळा दात स्वच्छ (ब्रश Brush ) करण्याची काळजी मात्र घेत नाही. इथेच चूक होते अन नंतर मुलांना त्रास सुरू होतो.
हेही वाचा - Maharashtra : राज्यात येथे सापडलाय सोन्याचा खजिना, यातून झाला मोठा उलगडा
तज्ञ काय म्हणतात?
लहान मुलांचे हट्ट पुरवताना त्यांना खाण्याचे गोड पदार्थ (Sweet Tooth) किंवा जंक फूड मात्र घेऊन देऊ नका. कारण दातांना लागणारी कीड लहान मुलांचे केवळ दातांवरच परिणाम करून जात नाही तर त्यांच्या मानसिक आघात (Mental Health and Children) सुद्धा करत असल्याची शक्यता बालदंत रोग तज्ञ बोलून दाखवतात. त्यामुळे मुलांचे हट्ट पुरवतांना आरोग्याची काळजी घ्यायला विसरू नका असा सल्ला तज्ञ देतात.