एका आंब्याची किंमतच अडीच लाख, पेटी घ्यायला गेलो तर पडेल इतका भाव

ये आम है पर 'आम' नही, किंमत ऐकून चक्रवाल, पाहा किती किंमत

Updated: Jan 6, 2022, 08:31 PM IST
एका आंब्याची किंमतच अडीच लाख, पेटी घ्यायला गेलो तर पडेल इतका भाव title=

विष्णू बुरगे, झी २४ तास, बीड : फळांचा राजा म्हणून आंब्याकडे पाहिलं जातं. आंबा आवड नाही अशी लोक फार बोटावर मोजणारी दिसतील. नाहीतर लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच आंबा आवडतो. त्यातही हापूस म्हणजे सर्वात उत्तम प्रतीचा आंबा असं म्हटलं जातं. पण आता हापूसपेक्षाही रसाळ आणि हापूसपेक्षाही महागडा असा जपानी आंबा बीडच्या मातीत पिकतोय. 

या आंब्याची किंमत किती? 
या आंब्याची किंमत तर लाखो रुपये आहे. एका आंब्यासाठी अडीच लाख मोजावे लागणार आहेत. तर एका पेटीचा हिशोब केला तर ही किंमत चक्रावून टाकणारी आहे. एका पेटीचा विचार केला तर साधारण 5 डझन आंबे येतात. म्हणजे 12 गुणीले 5 केलं तर 60. या 60 आंब्यांची किंमत कोटींच्या घरात जाते. 

काय आहे या आंब्याचं वैशिष्ट्यं?

तैयो नो तामांगो नावाचा हा आंबा चवीला एकदम रसाळ आणि महागडा देखील आहे. आता हाच जपानी आंबा महाराष्ट्राच्या मातीत पिकणार आहे. बीडमधील प्रयोगशील शेतकरी धैर्यशील सोळुंके यांनी हा प्रयोग करायचं ठरवलं आहे. त्यासाठी त्यांनी गेल्या जुलै महिन्यात कोलकात्याहून आणलेल्या 20 रोपांची लागवड पुसरा इथल्या शेतात केली आहे या रोपांचीच किंमत प्रत्येकी २ हजार रुपये आहे. 

जपानमधील मियाजारी प्रांतात पूर्वापार या आंब्याची लागवड होते. सूर्याचे अंडे अशी या आंब्याची जपानमध्ये ओळख आहे. सुरूवातीला हा आंबा पिवळा असतो. मात्र जसजसा तो पिकतो, तसा तो लाल होतो. एका आंब्याचं वजन साधारण 900 ग्रॅम ते एक किलो भरतं. आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच लाख रुपये किलोनं तो विकला जातो. 

आता प्रतीक्षा आहे ती प्रत्यक्षात पाडाला तैयो नो तामांगो आंबा लागण्याची. सोळंकेंचा हा प्रयोग यशस्वी झाला तर आंबा लागवड करणा-या शेतक-यांच्या जीवनात ही नवी आर्थिक क्रांती ठरू शकते.