पक्षी वाचवण्यासाठी विद्यार्थांचा कौतुकास्पद उपक्रम

वाढत्या तापमानांमुळं दाणापाणी मिळत नसल्यानं अनेकदा पक्षी मृत पावण्याच्या घटना घडतात. म्हणूनच या पक्षांना जीवदान मिळावं तसचं विद्यार्थ्यांमध्ये पक्षांबद्दल गोडी निर्माण व्हावी याकरिता जळगावातील एका शाळेनं पुढाकार घेतलाय.

विकास भदाणे | Updated: Apr 15, 2018, 06:48 PM IST
पक्षी वाचवण्यासाठी विद्यार्थांचा कौतुकास्पद उपक्रम title=

विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव : उन्हाची दाहकता वाढलेली असुन पक्षांची जगण्याची धडपड तीव्र होतांना दिसतीये. अशावेळी वाढत्या तापमानांमुळं दाणापाणी मिळत नसल्यानं अनेकदा पक्षी मृत पावण्याच्या घटना घडतात. म्हणूनच या पक्षांना जीवदान मिळावं तसचं विद्यार्थ्यांमध्ये पक्षांबद्दल गोडी निर्माण व्हावी याकरिता जळगावातील एका शाळेनं पुढाकार घेतलाय.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

जळगावात एप्रिल मे महिन्यात तापमानाचा पारा कधी ४४ ते कधी ४७ डिग्री अंश सेल्सियसपर्यंत जातो. यामुळं जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होऊन भूगर्भातील जलपातळी खोल जाते. पर्यायानं उन्हाळ्यात पशुपक्षीचं काय तर माणसांनाही पाणी मिळणं कठीण होतं.

विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

प्यायला पाणी मिळत नसल्यानं अनेक दुर्मिळ पक्षी मृत पावतात. यामुळे जळगावातल्या काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयात शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत परिसरातील झाडांवर पाण्याचं परळ बसविण्यात आलंय. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्येही ही परळ पाण्याने भरण्यात येतील त्यासाठीचं नियोजनदेखील शाळेनं केलंय. 

विविध जातीचे, रंगाचे पक्षी पाहायला मिळणं आजकाल दुरापास्त झालंय. अशावेळी शाळेतील झाडांवर परळ लावल्यानं विविध पक्षी पाणी प्यायला येतील आणि ते आम्हाला पाहायला मिळतील, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी म्हटलयं.

पक्षांची निवासस्थाने धोक्यात

शहरात सिमेंटचे जंगल वाढत असल्यानं झाडांची संख्या दिवसेंदिवस घटतेय. त्यामुळं पक्षांची निवासस्थाने धोक्यात आलीय. हे सगळं बदलायचं असेल तर प्रत्येकानं पक्षांसाठी दाणा-पाण्याची सोय करणं गरजेचं आहे.

जळगाव । पक्षी वाचविण्यासाठी काशीबाई कोल्हे विद्यालय विद्यार्थ्यांचा पुढाकार