ट्रॅक्टरने चिरडलेल्या दोघांचा जागीच मृत्यू, जमावाने ट्रॅक्टर जाळला

अवैध वाळू उपसा करून बेदरकारपणे चालणाऱ्या ट्रॅक्टरखाली चिरडून दोन शाळकरी मुलांचा जागीच मृत्यू तर एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला. 

Updated: Feb 21, 2019, 08:01 PM IST
ट्रॅक्टरने चिरडलेल्या दोघांचा जागीच मृत्यू, जमावाने ट्रॅक्टर जाळला title=

जळगाव : अवैध वाळू उपसा करून बेदरकारपणे चालणाऱ्या ट्रॅक्टरखाली चिरडून दोन शाळकरी मुलांचा जागीच मृत्यू तर एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला. जळगाव जिल्ह्यात यावल तालुक्यातल्या आडगाव कासारखेडा फाट्यावर सकाळी हा अपघात झाला. अपघातानंतर ट्रॅक्टरचालकाने घटनास्थळाहून पळ काढला. हा अपघात इतका भीषण होता की मुलांचे मृतदेह अक्षरशः छिन्ननविच्छिन झाले. यामुळे संतप्त जमावाने ट्रॅक्टर पेटवून दिला. 

वाळू उपशावर बंदी असतानाही जळगाव जिल्ह्यात महसूल विभागाच्या आशीर्वादानं मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा चालतो. यामुळं वाळू उपसा करणाऱ्या या वाहनांखाली वारंवार बळींच्या घटना घडत असताना जिल्हा महसूल प्रशासन मात्र काहीच कडक कारवाई करताना दिसत नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे महसूल खाते असतानाही त्यांनीही अवैध वाळू उपश्याप्रकरणी अद्यापपर्यंत दखल घेतलेली नाही