चर्चगेट रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायरवर अडकले जॅकेट; विरारकडे जाणाऱ्या लोकल खोळंबल्या

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. चर्चगेट रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायरवर जॅकेट अडकले आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jul 22, 2024, 04:21 PM IST
चर्चगेट रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायरवर अडकले जॅकेट; विरारकडे जाणाऱ्या लोकल खोळंबल्या title=

Western Railway Churchgate Station : पश्चिम रेल्वे मार्गावरील विरारच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. ओव्हरहेड वायरवरवर जॅकेट अडकल्याने वाहतूक खोळंबली आहे. चर्चगेट रेल्वे स्थानकात हा विचित्र प्रकार घडला आहे. जॅकेट हटवल्यानंतर वाहतूक सुरळूत होईल. 

नेमकं काय घडलं?

चर्चगेट स्थानकातील फलाट क्रमांक 2 च्या ओव्हरहेड वायरवर हे जॅकेट अडकले आहे.  ओव्हरहेड वायरवरच जॅकेट अडकले असल्याने पश्चिम रेल्वेची विरारच्या दिशेने जाणारी वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे.  जवळपास 10 ते 15 मिनिटं पश्चिम रेल्वेची वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे.  वायरवर पडलेलं जॅकेट काढण्याचे RPF जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.  

मध्य रेेल्वेही विस्कळीत

दरम्यान, मध्य रेल्वे देखील विस्कळीत झाली आहे. ठाकुर्ली स्टेशन जवळ एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे.  कल्याणच्या दिशेने जाणा-या रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे.  डाऊनफास्ट ट्रॅकवर रेल्वे  उभ्या होत्या.  अनेक रेल्वे एकाच जागेवर थांबल्या होत्या. सिग्नल यंत्रणेतील झालेला बिघाड आता दुरुस्त करण्यात आला आहे. त्यामुळे लोकल सेवा सुरळीत होत आहे. सध्या लोकल या नेहमीप्रमाणे पाच ते दहा मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे कल्याण स्थानकातील प्रवाशांची झालेली मोठी गर्दी आता कमी झाली आहे. मुंबईत पुढील 24 तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तिन्ही मार्गावरील लोकल ट्रेन उशीरानं धावत आहेत.