इंदापूर : राज्यात विविध प्रश्नांवर कधी आंदोलन तर कधी आंदोलनाचा स्टंट करणा-या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी आता फिल्मी आंदोलन केलंय.
नेहमी रस्त्यावर आंदोलन करताना दिसणा-या तृप्ती देसाईंचे आता रुपेरी पडद्यावरही आंदोलकाच्या रुपात दिसणार आहेत. "नवरा पंच बायको सरपंच" या मराठी चित्रपटात त्या झळकणार आहे. या चित्रपटाचं सध्या इंदापूरमध्ये शूटिंग सुरू आहे.
तृप्ती देसाई गाडीतून उतरल्या आणि आंदोलनात सहभागी झाल्या. त्यावेळी इंदापूरकरांना खरोखर आंदोलन सुरू असल्याचं वाटलं. त्यामुळं बघ्यांमध्ये काही काळ संभ्रम निर्माण झाला. तृप्ती देसाईंसाठी आंदोलन हे नेहमीचेच असल्यामुळं त्यांच्यावर रिटेक करण्याची वेळ आली नाही.