घरातून गायब झालेलं 2 लाखाचं सोनं म्हशीच्या पोटात सापडलं; नेमकं घडल काय?

वाशिममध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे. घरातून गायब झालेलं दोन लाखाचं सोनं म्हशीच्या पोटात सापडलं आहे. 

Updated: Sep 29, 2023, 06:37 PM IST
 घरातून गायब झालेलं 2 लाखाचं सोनं म्हशीच्या पोटात सापडलं; नेमकं घडल काय? title=

Washim News : घरातून गायब झालेलं 2 लाखाचं सोनं म्हशीच्या पोटात सापडलं आहे. वाशिममध्ये हा विचित्र प्रकार घडला आहे. म्हशीच्या पोटात दोन लाख रुपयांची सोन्याची पोत आढळलीय.  घरातल्या महिलांनी सोयाबिनच्या शेंगा सोलून टरफलं म्हशीच्या ताटात काढली. याटरफलांसह सोन्याची पोतही म्हशीने खाल्ली. अखेरीस सोनं गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर म्हशीवर शस्त्रक्रिया करुन सोनं परत मिळवण्यात आले. 

अनावधानाने गीताबाई भोयर यांची सोन्याची पोतही त्याच ताटात राहिली. सकाळी जेव्हा त्यांना आपल्या गळ्यात पोत दिसली नाही तेव्हा शोधाशोध करण्यात आली. सोयाबिनच्या टरफलांचं ताट म्हशीला दिल्याचं त्यांना आठवलं. अखेर सोनोग्राफी आणि त्यानंतर ऑपरेशन करुन म्हशीच्या पोटातली सोन्याची ही पोत बाहेर काढण्यात आली. तेव्हा जनावरांना चारा टाकताना काळजी घ्या असं आवाहन डॉक्टर्सनी केलंय.. मात्र या घटनेची एकच चर्चा सध्या राज्यभरात आहे. वैद्यकीय अधिकाऱ्याच्या प्रयत्नानंतर ती शस्त्रक्रिया करून सोन्याची पोत जरी हस्तगत झाली असली तरी या मुक्या जनावरांना मात्र मोठी इजा होऊन वेदना सहन करावया लागल्या आहे.

नेमका काय आहे प्रकार?

वाशिम जिल्ह्यातील सार्सी येथील शेतकरी रामहरी भोयर हे शेती व्यवसाय करतात शेती म्हटलं तर गुरे ढोरे आलीच त्यामुळे त्यांच्याकडे बैल गाई म्हैस गुरे ढोरे आहेत तसेच त्यांच्याकडे एक म्हैस सुद्धा आहे. तर खरीप हंगामाचे सीजन असल्याने त्यांच्या शेतात सोयाबीन तूर उडीद ही पिके आहेत.  सोयाबीनला  शेंगा लागल्याने  त्या शेंगा  ते घरी घेऊन आले होते. त्यांच्या घरातील महिलांनी भाजी करण्यासाठी  सोयाबीन शेंगा सोलल्या. त्याची टरफले ताटात काढली आणि रात्री झोपताना गळ्यातील दोन तोळे वजन असलेली सोन्याची पोथ अनावधानाने त्याच ताटात  राहिल्या गेली. मात्र हेच शेंगाचे टरफल सकाळी अलप गुराचे खाद्य म्हणून म्हशी समोर खाण्यासाठी  ठेवली या शेंगा च्या टरफला सोबत सोन्याची पोथ देखील म्हशीच्या खाण्यात गेली.

पण, गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची पोथ न दिसल्याने  गिताबाई भोईर ह्या चक्रावून गेल्या पोथ तुटून पडली की काय किंवा चोरी गेली की काय हे त्यांना कळेनासे झाले त्यामुळे त्यांनी आपली पती रामहरी भोयर यांना गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची पोत दिसत नसून ती म्हशीच्या खाण्यात तर गेली नाही ना असे सांगितले त्याच्या पत्नी गीताबाई भोयर दोन तोळ्यांची सोन्याच्याची कुठे पडली या चिंतेत पडल्या नंतर त्यांच्या लक्षात आले की त्या ताटात सोन्याची पोथ ठेवली होती.

म्हशीने चाऱ्यासोबत सोनं खाल्ल

म्हशीने चाऱ्या सोबत खाल्ली तर नाही ना  त्यांनी त्या म्हशीला जनावराच्या रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी मेटल डिटेक्शन वरून म्हशीच्या पोटात सोन्याची पोथ असल्याची खात्री केल्यानंतर एक दिवस वाट बघितली. मात्र, दुसऱ्या दिवशी भोयर यांनी म्हशीची सोनोग्राफी करून शस्त्रक्रिया करण्यात आली व म्हशीच्या पोटातील दोन तोळ्याची सोन्याची पोथ काढण्यात आल्यानंतर भोयर परिवाराचा जिवात-जीव आला. या सोन्याच्या पोथीची किंमत अंदाजे अडीच लाख रुपये असल्याचे शेतकरी भोयर सांगतात. तर ऑपरेशन नंतर सध्या म्हशीची तब्येत व्यवस्थित असून ती चारा खात आहे. जनावरांना चारा टाकताना काळजी घेण्याचं आव्हान डॉक्टरांनी केलं. चित्रपटाला लाजवेल अशा वास्तविक घटनेनंतर जिल्ह्यात या घटनेची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.