गणेश मोहोळ, झी मीडिया, वाशिम: पैशांसाठी फुसवणुक, लुटमार इतकचं काय तर खून देखील केला जात आहे. मात्र, प्रामाणिकपणा हाच खरा दागिना असतो हे वर्धा (Wardha) येथे रस्त्यावर कांदा, विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीने कृतीतून सिद्ध करुन दाखवले आहे(Positive News). 35 हजारांची रोकड आणि आठ लाखांचे दागिने या विक्रेत्याने परत करत माणुसकीचे दर्शन दिले आहे (Man return gold jewellery and cash). या वक्तीने दागिने करत करुन दाखवलेल्या इमानदारीचे सर्वत्र कौतुक होत आहे. दागिने परत मिळालेला व्यक्की देखील भावूक झाला आहे.
वाशिम जिल्ह्यातील एरंडा येथील रमेश घुगे यांचे हे दागिने आणि रोकड आहे. घुगे यांनी हे दागिने बँकेत गहाण ठेवले होते. बँकेतून सोडवून आणलेले हे 77 ग्राम सोन्याचे दागिने 35 हजार रोख रक्कम घरी घेऊन जात असताना घुगे यांच्याकडून गहाळ झाले. मात्र, वाशीम शहरातील बाबासाहेब आंबेडकर चौकात आपला कांदा, लसूणचा व्यवसाय करणारे शेख जाहेद यांना हे दागिने मिळाले. जाहेद यांनी माणुसकीचा परिचय देत हे दागिने आणि रोकड पोलिस स्टेशनला जमा केली. दरम्यान सर्व मुद्देमाल मुळं मालकाला परत मिळाल्याने त्यांच्या चेहरा भावुक झाल्याचं दिसून आले.
मालेगाव तालुक्यातील एरंडा येथील रमेश घुगे यांच्या घरी मुलाचं लग्न असल्याने बँकेत असलेलं 77 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख 35 हजार असे एकूण अंदाजे 8 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हरवला होता. त्यामुळं लग्न होईल की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र कांदे विकणाऱ्यानी मुद्देमाल परत केल्याने त्यांनी त्यांचे आभार मानले आहे.
रमेश घुगे यांच्या सोन्याच्या दागिन्यासह 35 हजार रोख रक्कम गहाळ झाल्याची तक्रार वाशिम शहर पोलिसात दाखल झाली होती. मात्र, काही निष्पन्न झाले नव्हते. दरम्यान शेख जाहेद यांनी मिळालेला मुद्देमाल पोलिस ठाण्यात जमा केला. यानंतर पोलिसांनी घुगे यांच्याशी संपर्क साधला. पोलिस ठाण्यात शेख जाहेद यांच्या हस्तेच रमेश घुगे यांना हे दागिने परत देण्यात आले. दागिने आणि रक्कम पाहून रमेश घुमे यांना भरुन आले. त्यांचे डोळे पाणावले.