आडनावावरून ट्रोल झाल्याने संतापला; थेट चौकात जन्म प्रमाणपत्राचा बॅनर लावला

संतापाच्या भरात कोण काय करेल याचा नेम नाही. सततच्या ट्रोलिंगला कंटाळून एका तरुणाने चौकात आपले जन्म प्रमाणपत्र लावले आहे. 

Updated: Dec 2, 2023, 11:55 PM IST
आडनावावरून ट्रोल झाल्याने संतापला; थेट चौकात जन्म प्रमाणपत्राचा बॅनर लावला  title=

Amravati News : आडनावावरून ट्रोल झाल्याने एका व्यावसायिकाने चक्क फ्लेक्स वर जन्म प्रमाणपत्र लावले आहे. अमरावती शहरात या बॅनरची जोरदार चर्चा आहे. नेमका काय आहे प्रकार जाणून घेऊया.  
आपल्याकडे आडनावावरून लगेच त्या व्यक्तीची जात व प्रांत शोधण्याची व नंतर ट्रोल करण्याची परंपरा लागलेली आहे. या ट्रोलला कंटाळून एका व्यावसायिकाने आपल्या रेस्टॉरंट बाहेर मोठ्या फ्लेक्स वर चक्क मी महाराष्ट्रीय व जन्म प्रमाणपत्र लावून ठेवलेले आहे. 

सनी शेट्टी असे या तरुणाचे नाव आहे. सनी शेट्टी या युवकाने अमरावती येथे आपल्या उदर्निरावाहासाठी बडनेरा मार्गावर रेस्टॉरंट 2 वर्षापूर्वी सुरू केले. मात्र, शेट्टी नावावरून ते आंध्र प्रदेशचे असावे असे लोकांना वाटत होते व त्यावरून सनी शेट्टी यांना विविध मार्गाने ट्रोल केले जात होते. अखेर या ट्रोलला कंटाळून सनी शेट्टी यांनी आपलं जन्म प्रमाणपत्र मोठ्या फ्लेक्सवर लावत मी महाराष्ट्रीय असल्याचा स्पष्ट उल्लेख त्यावर केला. जन्म प्रमाणत्रावर सनी शेट्टी यांचा जन्म चंद्रपूर मध्ये झाला असून आपण महाराष्ट्र असल्याचा उल्लेख या बॅनर वर केला. यामुळे सध्या मी महाराष्ट्रीय हे बॅनर चांगलेच व्हायरल झाले असून चर्चेचा विषय ठरत आहे.

कात्रजचा खून झाला; पुण्यातील बॅनर चर्चेत

सुसंस्कृत पुणे शहरात नेमकं चाललंय तरी काय ? असा प्रश्न प्रत्येक पुणेकर व्यक्तीला पडलाय. पुणे शहरात लागलेल्या एका बॅनरनं सा-या शहराचं लक्ष वेधून घेतले होते.  या बॅनरवर ठळक अक्षरात कात्रजचा खून झाला असं लिहिण्यात आलंय. इतकच नाही तर एक रक्तानं माखलेला सुराही दाखवण्यात आलाय. भर दिवसा, भर चौकात हा बॅनर लावण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात असा बॅनर झळकल्य़ानं लोकांमध्ये भीतीचं वातवरण आहे. पोलिसांनी पोस्टर लावल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय. 

गव्याच्या श्रद्धांजलीसाठी लावलेले पोस्टर

पुण्यात कधी काय होईल याचा नेम नाही. गेल्यावर्षी एका भरकटलेल्या गव्याचा पुण्यात मृत्यू झाला होता.कोथरूडमध्ये ही घटना घडली होती. या घटनेला एक वर्ष पूर्ण होतंय. गव्याच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त करणा-या पुणेकरांनी आता चक्क त्याच्या श्रद्धांजलीचे बॅनर्स लावले आहेत. इतकच नाही तर कोथरूडमध्ये एका सभेचं आयोजनही केलंय. या सभेला प्रायश्चित्त सभा असं नाव देण्यात आलंय. 9 डिसेंबरला या सभेचं आयोजन करण्यात आलंय. पुणेकरांनी गव्याच्या श्रद्धांजलीसाठी लावलेले पोस्टर आणि प्रायश्चित सभा सध्या सगळीकडे चर्चेचा विषय बनलाय.