मुंबईसह कोकणात अतिवृष्टीची शक्यता, हवामान खात्याचा नवा अंदाज

...

Updated: Jun 8, 2018, 08:26 AM IST
मुंबईसह कोकणात अतिवृष्टीची शक्यता, हवामान खात्याचा नवा अंदाज title=

मुंबई : हवामान विभागानं आज आणि उद्या मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिलाय. नवीन अंदाजानुसार मुंबईसह संपूर्ण कोकणसाठी आज आणि उद्याचा दिवस महत्त्वपूर्ण असणार आहे. मान्सून दक्षिण गोव्याच्या किनारपट्टीवर दाखल झाला असून तो कोकणात येत्या १२ तासांत येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय.

यापूर्वी हवामान खात्यानं १० आणि ११ जूनला अतिवृष्टीचा इशारा दिला होता. मात्र, या दोन्ही दिवशी आज आणि उद्याच्या तुलनेत कमी पाऊस असेल असा अंदाजही व्यक्त करण्यात आलाय. 

गुरुवारी मान्सूनने गोव्याचा अर्धा भाग व्यापला आहे. मान्सूनने अर्धा गोवा म्हणजेच दक्षिण गोवा व्यापलं असून मुरगाव, गदगपर्यंत मान्सूनचा पाऊस पोहोचलाय. येत्या १२ तासांत मान्सून राज्यात दाखल होईल असा अंदाज गोवा वेधशाळेने वर्तवला आहे.