अवैध रिक्षा चालकाची अधिकृत रिक्षाचालकाला मारहाण

अवैधपणे रिक्षा चालवणाऱ्या रिक्षाचालकांची मुजोरी

Updated: Oct 29, 2018, 10:54 AM IST
अवैध रिक्षा चालकाची अधिकृत रिक्षाचालकाला मारहाण title=

कल्याण : अवैधपणे रिक्षा चालवणाऱ्या रिक्षाचालकांची मुजोरी गेल्या काही दिवसात वाढताना पाहायला मिळतेय. कल्याणमधल्या प्रवासी आणि पोलिसांसह आता अधिकृत रिक्षाचालकांनाही याचा फटका बसला आहे.

कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर उल्हासनगरला जाणाऱ्या रिक्षा स्टँडमध्ये विना परमिट आणि बॅच तसंच गणवेशासह सलमान खान हा रिक्षाचालक रिक्षा घेऊन उभा होता. त्याला अधिकृत रिक्षाचालकांनी हटकलं. तेव्हा सलमान खान तिथून निघून गेला. मात्र कल्याण-उल्हासनगर सीमेवर आपल्या साथीदारांना घेऊन सलमाननं पाळत ठेवली.

कल्याण रिक्षा स्टँडवर विरोध करणाऱ्या संतोष वानखेडे या रिक्षाचालकाला गाठून सलमाननं आपल्या साथीदारांसह त्याला मारहाण केली. यात जखमी झालेल्या संतोष वानखेडेवक उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सलमान खान आणि त्याच्या साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.