कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कंत्राटी कामगारांनी पुन्हा संप सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी ही या कामगारांनी संप केला होता पण केडीएमसीच्या आयुक्तांनी आश्वासन देऊन सुद्धा पगार झाला नाही म्हणून कंत्राटी कामगाराचा सकाळ पासून संप सुरू आहे.
कंत्राटी कामगारांमध्ये सफाई कामगार आणि घंटा गडीवरील वाहनचालकांचा समावेश आहे. कचराप्रश्न गंभीर बनणार डोंबिवलीच्या खंबालपाडा डेपोमधून एकही कचऱ्याची गाडी बाहेर पडलेली नाही. कर्मचाऱ्यांनी डेपोमध्ये ठिय्या आंदोलन सुरू आहे.