...तर सरकारमधून बाहेर पडणार- अशोक चव्हाण

तीन पक्षाच्या सरकारला सोनिया गांधींची विरोध होता. परंतु, आम्ही सोनिया गांधी यांना राजी केले.

Updated: Jan 27, 2020, 01:18 PM IST
...तर सरकारमधून बाहेर पडणार- अशोक चव्हाण title=

नांदेड: सरकारकडून कोणतीही घटनाबह्य कृती घडल्यास काँग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर पडेल, असे वक्तव्य काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केले. ते रविवारी नांदेडमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकासआघाडी सरकारच्या स्थापनेवेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये झालेल्या करारमदारांचा खुलासा केला.

यावेळी अशोक चव्हाण यांनी म्हटले की, महाराष्ट्रात तीन पक्षाचे व तीन विचारांचे सरकार चालणार कसे?, असा सवाल करीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी तीन पक्षाच्या सरकारला (महाविकास आघाडी) विरोध केला होता, परंतु, आम्ही सोनिया गांधी यांना राजी केले. परंतु, त्यावेळी आम्ही घटनाबाह्य काम करणार नाही, असे शिवसेनेकडून लिहून घेतले. सेनेने जर उद्देशिकबाहेर काम केले तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

आमचे व्यवस्थित चाललेय, काही बातम्या जाणूनबुजून पेरल्या जात आहे - अजित पवार

तसेच तीन पक्षांचे सरकार म्हणजे मल्टिस्टारर चित्रपट आहे.  सुदैवाने आमचा सिनेमा सध्या बरा चालला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा उद्धव ठाकरे, कुणालाही वाटले नव्हते की आम्ही एकत्र येऊ. पण हल्ली मल्टिस्टारर सिनेमाचा जमाना आहे. सिनेमात तीन-तीन हिरो पाहिजेत, असेही चव्हाण यांनी म्हटले. 

पृथ्वीराज यांचा गौप्यस्फोट म्हणजे शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न?

मात्र, हे सरकार घटनेच्या आधारेच चाललेच पाहिजे. जर असे झाले नाही तर सरकारमधून बाहेर पडण्याच्या कडक सूचना सोनिया गांधी यांनी दिल्या आहेत. याची संपूर्ण माहिती आम्ही उद्धव ठाकरे यांना दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनेच्या बाहेर जाणार नाहीत, असेही चव्हाण यांनी सांगितले.