पूजा खेडकरच्या आईचा प्रताप! शेतात घुसून पिस्तुल दाखवून शेतकऱ्यांना धमकावलं; पाहा Video

IAS Pooja Khedkar Mother Viral Video: मनोरमा यांनी त्यांच्या बंगल्याबाहेर आलेल्या पत्रकारांबरोबर काही अधिकाऱ्यांनाही धमकावल्याचा प्रकार 11 जुलै रोजी घडल्यानंतर आता हा व्हिडीओ समोर आला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 12, 2024, 11:36 AM IST
पूजा खेडकरच्या आईचा प्रताप! शेतात घुसून पिस्तुल दाखवून शेतकऱ्यांना धमकावलं; पाहा Video title=
हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय

IAS Pooja Khedkar Mother Viral Video: पुण्यातील आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण सध्या राज्याबरोबरच संपूर्ण देशामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. आपल्या खासगी ऑडी गाडीवर लाल दिवा लावण्यामुळे अडचणीत आलेल्या पूजा खेडकर यांचा पाय दिवसोंदिवस खोलात जाताना दिसत आहे. लाल दिव्याबरोबरच आता प्रशिक्षणार्थी असताना कार, स्वयीक सहाय्यकाबरोबरच वेगळ्या केबिनसाठी मागणी केल्याचे पूजा यांचे जिल्हाधिकारी कार्यालयातील व्यक्तीबरोबरच व्हॉट्सअप चॅट समोर आले आहेत. त्यातच दिव्यांग म्हणून मिळालेलं प्रमाणपत्रही वादात साडलं असून वडिलांची संपत्ती 40 कोटींहून अधिक असताना पूजा यांनी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र कसं मिळालं यासारखे प्रश्न सध्या अनुत्तरितच आहेत. असं असतानाच कारवाईसाठी पूजा यांच्या पुण्यातील घरी पोहोचलेल्या पोलिस आणि अधिकाऱ्यांचं वार्तांकन करायला गेलेल्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींबरोबर पूजाची आई मनोरमा खेडकर यांनी उद्धट वागणूक दिल्याचा प्रकार गुरुवारी घडला. आता याच मनोरमा यांचा एक जुना व्हिडीओ समोर आला आहे. 

जुने चॅट आणि व्हिडीओ चर्चेत

पूजा खेडकर अडचणीत आल्यानंतर त्याने अनेक जुने चॅट, व्हिडीओ आणि सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आहेत. असं असतानाच त्यांच्या आईचा एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आला असून त्या हातात रिव्हॉल्वर आणि सोबत बाउन्सर घेऊन जमिनीसाठी वाद घालत असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओमध्ये मनोरमा एका शेतकरी कुटुंबाला धमकावत असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाला आहे. खेडकर कुटुंबानं पुण्यातील मुळशी तालुक्यात 25 एकर जमीन खरेदी केली आहे. त्याच ठिकाणी स्थानिक शेतकऱ्यांबरोबर झालेल्या वादाचा हा व्हिडीओ असल्याचं समजतं. या व्हिडीओमध्ये मनोरमा खेडकर या बाऊन्सर आणि हातात पिस्तूल घेऊन शेतक-यासोबत वाद घालताना स्पष्टपणे दिसतंय.

व्हिडीओमध्ये संवाद काय?

"जागा माझ्या नावावर आहे. मूळ मालक मी आहे. सातबारा माझ्या नावावर आहे. मला आधी कोर्टाचा कागद आणून दाखवायचा," असं मनोरमा हातात पिस्तूल घेऊन वाद घालताना म्हणत आहेत. "मी कोर्टात येणार, काय व्हायचं ते होऊ दे," असं मनोरमा म्हणताना दिसत आहेत.

नक्की वाचा >> IAS Pooja Khedkar Case: थेट पंतप्रधान कार्यालयाकडून दखल; महाराष्ट्र सरकारचं टेन्शन वाढलं

व्हिडीओ शूट करणारा शेतकऱ्यांबरोबरची व्यक्ती, 'मॅडम आपलं कायदेशीर सुरु आहे. तुम्ही आम्हाला का त्रास देताय?' असं विचारतो. त्यावर मनोरमा, "तुम्ही मला कायद्याचं सांगू नका. कायद्याने मला सांगितलेलं नाही की तुम्ही करु नका म्हणून," असं उत्तर देताना दिसतात. त्यानंतर बराच वेळ हा वाद सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

पूजा यांचे रिल्स गायब

पूजा खेडकर या स्वत: सोशल मीडियावर सक्रीय आहेत. त्या हा वाद समोर येण्याआधी इन्स्टाग्रामवर अनेक रिल्स शेअर करायच्या. मात्र हा वाद झाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावरील हे रिल्स डिलीट केले आहेत.