मुंबई ते पुणे प्रवास फक्त 25 मिनिटांत; 1200 च्या स्पीडने धावणार हायपरलूप ट्रेन; रॉकेटसारखा सुपरफास्ट प्रवास

India Hyperloop test track :  लवकरत भारतात विमानापेक्षा सुपरफास्ट हायपरलूप ट्रेन धावणार आहे. हायपरलूप ट्रेनमुळे मुंबई ते पुणे प्रवास फक्त 25 मिनीटांत होणार आहे. 

वनिता कांबळे | Updated: Dec 6, 2024, 05:42 PM IST
 मुंबई ते पुणे प्रवास फक्त 25 मिनिटांत; 1200 च्या स्पीडने धावणार हायपरलूप ट्रेन; रॉकेटसारखा सुपरफास्ट प्रवास  title=

Hyperloop Train Pune To Mumbai : मुंबई ते पुणे प्रवास फक्त 25 मिनीटांत करता येईल असं तुम्हाला कुणी सांगितले तर विश्वास बसणार नाही. पण, ही कल्पना नसून भविष्यात असा  रॉकेटसारखा सुपर फास्ट प्रवास करणे शक्य होणार आहे. लवकरच भारतात हायपरलूप ट्रेन सुरु होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हायपरलूप ट्रॅकचा व्हिडिओ शेअर केला आहे. ही ट्रेन 1200 च्या स्पीडने धावणार आहे.  

हे देखील वाचा.. .महाराष्ट्रातील दुसरा बुलेट ट्रेन प्रकल्प;  350 चा स्पीड, 766 किमीचा प्रवास फक्त साडेतीन तासात

भारतीय रेल्वे जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पसरले आहे. दळणवळणाचे जलद आणि सुखद माध्यम असल्याने लाखो लोक रेल्वेने प्रवास करत. रेल्वे प्रवास अधिक गतीमान करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.  देशात वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावत आहे. लवकरच बुलेट ट्रेन धावणार आहे. यानंतर आत लवकरच हायपरलूप ट्रेनमधून विमानापेक्षा सुपफास्ट प्रवास करता येणार आहे. हायपरलूप  ट्रेनच्या चाचणीसाठी भारतात 410 किमीचा ट्रॅक तयार झाला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हायपरलूप ट्रॅकचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हायपरलूप ट्रॅकचा व्हिडिओ शेअर केला आहे. भारताचा 410 किमीचा पहिला हिपलूप टेस्ट ट्रॅक तयार आहे. रेल्वे आणि आयआयटी मद्रास यांनी मिळून हा ट्रॅक तयार केला आहे. हायपरलूप ट्रेन प्रणालीमुळे भारतात वाहतुकीचा हाय-स्पीड  मार्ग खुला होणार आहे अशी पोस्ट  रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हायपरलूप ट्रॅकचा व्हिडिओ शेअर करताना लिहीली आहे.  

2019 मध्ये मुख्यमंत्रीपदी असताना देवेंद्र फडणवीस यांनी कर्जिन हायपूरलूप कंपनीच्या अमेरिकेतील चाचणी केंद्राला भेट दिली होती. मुंबई-पुणे या मार्गावर हायपरलूप तंत्रज्ञानावर आधारित अतिवेगवान रेल्वे प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला होता. या 100 टक्के इलेक्ट्रीक व कार्यक्षम प्रणालीमुळे दीड लाख टन कार्बनचे उत्सर्जन प्रतिवर्षी कमी होणार असून वेळेची बचत, पर्यावरण रक्षण, अपघातांच्या संख्येत घट, वाहतूक कोंडीतून सुटका असे अनेक सामाजिक व आर्थिक फायदेसुद्धा होणार आहेत.

भारतातील पहिली हायपरलूप ट्रेन मुंबई ते पुणे दरम्यान धावणार असल्याची चर्चा आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते पुणे हे अंतर केवळ 25 मिनिटांत पार करता येणार आहे. सध्या हे अंतर कापण्यासाठी रेल्वेला 3 ते 4 तास लागतात. हा विनाथांबा सुसाट प्रवास असेल. हायपूरलूप ट्रेनच्या या पॉडमध्ये एकावेळी 24-28 लोक बसू शकतील. हायपरलूप ही संकल्पना नवीन नाही. एलोन मस्क यांनी 2013 मध्ये ही आयडिया मांडली होती. लॉस एंजेलिस ते सॅन फ्रान्सिस्कोला न थांबता लोकांची ने-आण करण्यासाठी त्यांनी हायपरलूप ट्रेनची संकल्पना मांडली होती.     

हायपरलूप ट्रेन ही एक हाय स्पीड ट्रेन आहे. ट्यूब व्हॅक्यूममध्ये ही ट्रेन धावते. चुंबकीय तंत्रज्ञानाने सुसज्ज पॉडवर ही ट्रेन धावते. पारदर्शक ट्यूबमधून ही ट्रेन धावते. ट्यूबमध्ये घर्षण नसल्यामुळे हायपरलूप ट्रेन  वेग ताशी 1100 ते 1200 किमी इतका असतो. भारतीय रेल्वेने विकसित केलेल्या हायपरलूपचा कमाल वेग 600 किमी आहे. यामध्ये विजेचा खर्च खूपच कमी आहे.  ही हायपरलूप ट्रेन पूर्णपणे प्रदूषण मुक्त आहे.   
बुलेट ट्रेनपेक्षा हायपरलूप ट्रेन सुपरफास्ट आहे. या वेग ताशी 1100 किमी पर्यंत पोहोचू शकेल. म्हणजेच दिल्लीहून पाटण्याला जाण्यासाठी 1 तासापेक्षा कमी वेळ लागेल. मात्र, याचा परिचालन वेग ताशी 360 किमी आहे.